शहरं
Join us  
Trending Stories
1
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
4
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
5
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
6
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
7
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
8
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
9
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
10
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
11
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
12
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
13
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
14
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
15
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
16
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
17
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
18
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
19
Gold Silver Price Today: नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
20
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:14 IST

माजी नगरसेवक उमेश बोरगावकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात होते. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक ६मधून ते इच्छुक होते. मात्र, त्यांची उमेदवारी शिंदसेनेने कापली.

मुरलीधर भवार -

कल्याण : शिंदेसेनेकडून ५००पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज भरले होते. मात्र, मोजक्या उमेदवारांनाच संधी मिळाल्याने कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेत नाराजी उफाळून आली. ज्यांना अन्य पक्षातून उमेदवारी अर्ज भरायचे होते, त्यांनी भरले. या बंडखोरांची डोकेदुखी शिंदेसेनेला सहन करावी लागेल.

माजी नगरसेवक उमेश बोरगावकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात होते. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक ६मधून ते इच्छुक होते. मात्र, त्यांची उमेदवारी शिंदसेनेने कापली. या पॅनलमधून शिंदेसेनेने माजी नगरसेवक संजय पाटील आणि नीलिमा पाटील यांना उमेदवारी दिली. बोरगावकर यांनी हाती मशाल घेत उद्धवसेनेकडून अर्ज दाखल केला. शिंदेसेनेचे विधानसभा समन्वय श्रेयस समेळ हे पॅनल क्र. ९ मधून इच्छूक होते. मात्र जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या पत्नी अस्मिता यांना उमेदवारी दिली. त्यामुळे समेळ यांच्यासह ५७ पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.

शहरप्रमुखाच्या मुलाचा पत्ता कटकल्याण पश्चिमचे शिंदेसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांचा मुलगा अनिरुद्ध पाटील पॅनल क्रमांक ६ ड मधून इच्छुक हाेते. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांची उमेदवारी कापली गेली. अनिरूद्ध हे उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत; पण शहरप्रमुख पाटील यांची बहीण प्रमिला पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली. 

रसाळ यांनी भरला उद्धवसेनेकडून अर्जनिवडणूक जाहीर झाल्यावर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला हाेता. त्यांच्या प्रवेशाआधी भाजपचे माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. पॅनल क्रमांक १२ ड मधून ते इच्छुक होते. मात्र, शिंदेसेनेने या ठिकाणी पोटे यांना उमेदवारी दिली. रसाळ यांनी उद्धवसेनेकडून याच पॅनलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Discontent Surges in Shinde Sena; Over 500 Aspiring Candidates

Web Summary : Kalyan-Dombivli Shinde Sena faces internal strife as numerous aspirants were denied tickets. Rebellious members filed nominations from rival parties, causing headaches. Key figures defected to Uddhav Sena after being overlooked, triggering resignations by disgruntled officials, further intensifying the party's challenges.
टॅग्स :Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे