Kalyan Dombivali: कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ आस्थापनांकडून  70 हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 03:54 PM2021-08-02T15:54:02+5:302021-08-02T15:55:51+5:30

गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या विविध प्रभागातील प्रभागक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकांनी आपल्या प्रभागातील मंगल कार्यालये/आस्थापना/मॉल / हॉटेल इ.  ठिकाणी पाहणी केली

Kalyan Dombivali Fines of Rs 70000 recovered from 14 establishments violating Covid rules | Kalyan Dombivali: कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ आस्थापनांकडून  70 हजारांचा दंड वसूल

Kalyan Dombivali: कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ आस्थापनांकडून  70 हजारांचा दंड वसूल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या विविध प्रभागातील महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करन्याबाबत  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच निर्देश दिले होते.  गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या विविध प्रभागातील प्रभागक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकांनी आपल्या प्रभागातील मंगल कार्यालये/आस्थापना/मॉल / हॉटेल इ.  ठिकाणी पाहणी केली, पाहणी अंती नियम उल्लंणघन करणा-या दुकानांकडून एकूण 70 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

प्रभागनिहाय वसूल करण्यात आलेला दंड

जे  प्रभागक्षेत्र  - 3 आस्थापनांकडून रु. 15,000  
 
ड प्रभागक्षेत्र  - 5 आस्थापनांकडून रु. 20,000
 
फ प्रभागक्षेत्र - 1 आस्थापनेकडून रु. 5,000 
 
ह  प्रभागक्षेत्र - 2 आस्थापनांकडून रु. 15,000 
 
ग  प्रभागक्षेत्र - 1 आस्थापनेकडून रु. 5,000/
 
आय प्रभागक्षेत्र परिसरात  एका आस्थापनेकडून रु. 10,000/- 

आय प्रभागक्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी मलंग रोड व शीळफाटा रोड या परिसरातील 7 दुकाने कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सील केली, तसेच ई प्रभागक्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मालवण किनारा हे हॉटेल सील करण्याची कारवाई केली. 

महापालिका क्षेत्रात कोरोना साथीस आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून सर्व मंगल कार्यालये /आस्थापना/मॉल/हॉटेल इ.  नी कोविड नियमांचे  कटाक्षाने पालन करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात  आले आहे.

Web Title: Kalyan Dombivali Fines of Rs 70000 recovered from 14 establishments violating Covid rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.