शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

कल्याण-डोंबिवली : घराचे बांधकाम झाले महाग, रेती, सिमेंट, स्टीलचे वाढले भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 00:31 IST

Kalyan-Dombivali News : लॉकडाऊननंतर लगेचच रेती, सिमेंट आणि स्टीलचे भाव वाढले. त्यामुळे घरांचे बांधकाम महागले आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या बांधकाम व्यवसायाला साहित्य दरवाढीचा फटका बसला आहे.

- मुरलीधर भवार कल्याण :  कोरोनाचा प्रादुर्भाव मार्चमध्ये सुरू झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये परराज्यातील बांधकाम कामगार व मजूर आपल्या गावी परतले. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यवसायाला बसला. लॉकडाऊननंतर लगेचच रेती, सिमेंट आणि स्टीलचे भाव वाढले. त्यामुळे घरांचे बांधकाम महागले आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या बांधकाम व्यवसायाला साहित्य दरवाढीचा फटका बसला आहे. कल्याण-डोंबिवलीत जवळपास १५० पेक्षा जास्त नवीन गृहसंकुलांचे प्रकल्प सुरू होते. या प्रकल्पांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. याबाबत एमसीएचआय या बिल्डरांच्या संघटनेचे माजी अध्यक्ष रवी पाटील म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१७ मध्ये नोटाबंदीची घोषणा केली. त्याचा फटका बांधकाम व्यवयासाला बसला. त्यानंतर जागतिक मंदी आली. त्यातही व्यावसायिक तग धरून होता. मात्र, २०१९ ला पावसाने झोडपले होते. अतिवृष्टीचा व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यातून कुठे व्यावसायिक सावरत नाहीत तोच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. कल्याण-डोंबिवली परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करत व्यावसायिक अनलॉकमध्ये कुठे श्वास घेण्याचा प्रयत्न करीत असताना आता बांधकाम साहित्याच्या दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. तर, दुसरीकडे राज्य सरकारने वाळू व्यवसायाचा लिलाव बंद ठेवला आहे. त्यामुळे राज्यात वाळूचा तुटवडा आहे. आता बांधकामासाठी येत असलेली रेती ही गुजरातमधून येत आहे. त्यामुळे तिचा भाव जास्त आहे.’ 

मार्चनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका सगळ्याच उद्योग-व्यवसायांना बसला. कोरोनामुळे परप्रांतीय व आंतरराज्यातील मजूर हे त्यांच्या गावी परतले. त्यामुळे सिमेंट, स्टील आणि रेती वाहून नेणारे मजूर नसल्याने बांधकाम साहित्याचे दर वाढले.-  राकेश सोमानी, बांधकाम साहित्य विक्रेते

बांधकाम साहित्याचे दर का वाढले?कोरोनामुळे देशभर लागू झालेल्या लोकडाऊनमुळे सर्वत्र बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर जूननंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू झाले. मात्र, बंद असलेली सर्वच बांधकामे एकाचवेळी सुरू झाली. त्यामुळे बांधकाम साहित्यापासून ते मजुरांपर्यंत सर्वांचीच मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण झाली. त्यातच बांधकाम साहित्याचे भाव वाढले, 

टॅग्स :Homeघरkalyanकल्याणdombivaliडोंबिवली