शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाचा बळी घेणारा चोरटा व्हायरल व्हिडिओमुळे पकडला

By मुरलीधर भवार | Updated: March 28, 2024 17:16 IST

धावत्या ट्रेनमध्ये एक प्रवासी सेल्फी काढत असताना एक चोर फटका मारताना त्याच्या मोबाईलमध्ये कैद झाला.

मुरलीधर भवार, कल्याण : धावत्या ट्रेनमध्ये एक प्रवासी सेल्फी काढत असताना एक चोर फटका मारताना त्याच्या मोबाईलमध्ये कैद झाला. व्हिडिओ व्हायरल होताच कल्याण रेल्वे पोलिसानी आकाश जाधव या चोरटयाला ताब्यात घेतले. आकाशकडे फटका मारुन चोरलेला मोबाईल सापडला. धक्कादायक म्हणजे ज्या व्यक्तिचा मोबाईल आकाशने चोरला होता. तो व्यक्ती त्याच दरम्यान ट्रेनमधून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रभास भणगे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो सरकारी बँकेत कामाला होता. पुण्याहून होळीच्या कार्यक्रमाकरीता मुंबईला आला होता. होळीचा कार्यक्रम आटोपून तो पुन्हा पुण्याला जाण्यासाठी निघाला असता ही दुर्दैवी घटना कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानका दरम्यान घडली.

२५ मार्चला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जाहिद जैती नावाचा व्यक्ती इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना तो दारात उभा राहून सेल्फी घेत होता. जाहिद सेल्फी व्हीडीओ घेत असताना एका चोरट्याने जाहिदच्या हातावर फटका मारुन मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. जाहिदचा मोबाईल वाचला. त्याच्या  व्हिडीओत तो चोरटा कैद झाला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी लगेच त्या आरोपीला उल्हासनगरहून अटक केली. त्याचे नाव आकाश जाधव असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून आणखीन एक महागडा मोबाईल हस्तगत केला. मोबाईल बंद होता. जेव्हा चोरलेला हा माोबाईल सुरु करण्यात आला. तेव्हा माहिती पडले की, हा मोबाईल पुण्यात राहणारे प्रभास भणगे यांचा आहे. 

ज्यांचा २५ तारखेच्या मध्यरात्री कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. त्यांचे नातेवाईक कल्याण रेल्वे पोलिस ठण्यात उभे होते. वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांनी त्याच मोबाईलहून फोन केला तेव्हा माहिती पडले की, हा मोबाईल प्रभास भणगे यांचा आहे. आकाश याने तो मोबाईल फटका मारुन चोरला आहे. दुर्दैव म्हणजे आकाशने फटका मारला. तेव्हा प्रवासी प्रभास भणगे हे चालत्या ट्रेनमधून खाली पडले. ते गाडीच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस