शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण जिल्हाध्यक्षपदाची धुरा जगन्नाथ शिंदे यांच्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 01:12 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : कार्याध्यक्षपदी वंडार पाटील

कल्याण : मागील काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याकल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व माजी आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांची, तर कार्याध्यक्षपदी डॉ. वंडार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या हस्ते बुधवारी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

एकेकाळी केडीएमसीत सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादीचे २०१५ मध्ये दोन नगरसेवक निवडून आले होते. मनपा निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाला असतानाही त्यातून पाच वर्षांत पक्षाने कोणताच धडा घेतलेला नव्हता. स्थानिक पातळीवर पक्षाची अधोगती व आगामी केडीएमसीची निवडणूक पाहता सक्षम चेहरा जिल्हाध्यक्षपदासाठी दिला जाईल, असे संकेत होते. दिवाळीपूर्वी कल्याणमध्ये झालेल्या मेळाव्यात कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा निरीक्षक म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लवकरच जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल, असे स्पष्ट केले होते. तत्पूर्वी मेळाव्याच्या निमित्ताने झालेल्या बैठकांमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी शिंदे यांच्या नावाला पसंती मिळाली होती. यासंदर्भात टोपे यांना मेळाव्यात निवेदनेही देण्यात आली होती.  

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरतnशिंदे हे वैद्यकीय क्षेत्रात ४० वर्षांपासून कार्यरत आहेत. आठ वेळा ते राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचेही ते १८ वर्षांपासून नेतृत्व करीत आहेत. n२०१४-२०२० दरम्यान त्यांनी विधान परिषदेची आमदारकी भूषविली आहे. तर, २००५ मध्ये शिंदे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्षाचा महापौर पहिल्यांदा केडीएमसीत विराजमान झाला होता. तर, डॉ. पाटील यांनी एपीएमसीचे सभापतीपद भूषविले आहे.  

पक्ष संघटना मजबुतीवर भरकेडीएमसीची निवडणूक पाहता पक्ष संघटना मजबूत करणे, याला प्राधान्य असणार आहे. मनपाकडून समस्या सोडविल्या जातात का, याकडेही लक्ष राहणार आहे.  कोरोनाचा काळ पाहता गरिबांना वैद्यकीय सेवा कशी मिळेल, यासाठीही विशेष प्रयत्न राहील, असे शिंदे म्हणाले. तर, जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करून नव्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली जाईल, असे पाटील म्हणाले. 

टॅग्स :kalyanकल्याणNCPराष्ट्रवादी काँग्रेस