केडीएमसी आयुक्तांनी दिले "हे" महत्वाचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 06:30 PM2021-10-25T18:30:44+5:302021-10-25T18:33:25+5:30

kalyan News : अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिकेत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असतात.

important order given by KDMC Commissioner | केडीएमसी आयुक्तांनी दिले "हे" महत्वाचे आदेश!

केडीएमसी आयुक्तांनी दिले "हे" महत्वाचे आदेश!

googlenewsNext

कल्याण - कल्याण डोंबिवली शहरात आरक्षित भूखंड  गिळंकृत करण्याचे प्रयत्न अनेकदा समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी एक महत्त्वपूर्ण  निर्णय घेतला आहे. ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवरील अनधिकृत बांधकामांवर त्वरित DPL (कायदेशीर विहीत प्रक्रिया)  सुरु करावी, असे निर्देश आयुक्तांनी आज दिले आहेत. 

अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिकेत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असतात. त्यामुळे ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर त्वरीत DPL सुरु करावी, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी आज संपन्न झालेल्या आढावा बैठकीत सर्व प्रभागाच्या सहा. आयुक्तांना दिले. 30 वर्षापेक्षा जुन्या परंतू रहिवास असलेल्या अनधिकृत इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेणेबाबत संबंधितांना नोटीसद्वारे कळवावे आणि त्यानंतर इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवाला अंती त्यांना धोकादायक घोषित करणेबाबतची कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.

 

Web Title: important order given by KDMC Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण