शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोतून बेकायदा मद्य वाहतूक, चार लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

By प्रशांत माने | Updated: May 9, 2024 20:41 IST

याप्रकरणी टेम्पोचालक अमित यादव याला अटक केली असून त्याने दारू कोठून आणली? कोणाला पुरवठा करणार होता याचा तपास सुरू आहे.

डोंबिवली : बेकायदा मद्य वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्क, डोंबिवली विभागाने बुधवारी कारवाई करीत १८८ बल्क लिटर विदेशी दारू आणि बिअर असा एकूण चार लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक अमित यादव याला अटक केली असून त्याने दारू कोठून आणली? कोणाला पुरवठा करणार होता याचा तपास सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभागाच्या पथकाला पूर्वेकडील निळजे, लोढा हेवन कासारिओ रोड याठिकाणी एका टेम्पोतून बेकायदा मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विभागाचे निरीक्षक किरणसिंग पाटील, दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, सागर धिडसे, रंजीत आडेे, एच. एम. देवकते, अमृता नगरकर आदींच्या पथकाने सापळा रचून टेम्पोवर कारवाई केली.

ड्राय डेच्या दिवशी कारवाईपश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात १ मे ड्राय डे च्या दिवशी एक महिला देशी-विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे मच्छी मार्केट परिसरात सापळा लावत पथकाने मैनाबाई भोईर या महिलेला अटक केल्याची माहिती दुयम निरीक्षक निकाळजे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदी