शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मताचा टक्का घसरला तर भाजप आमदार, नगरसेवकांचा पत्ता कट? बावनकुळे यांची तंबी 

By अनिकेत घमंडी | Updated: April 17, 2024 09:26 IST

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तंबी 

अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : लोकसभा निवडणुकीत ठिकठिकाणी महायुतीमधील नाराजी नाट्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाईचे ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या आमदार, नगरसेवकाच्या मतदारसंघात मतांचा टक्का घसरेल त्याचा उमेदवारीचा पत्ता कापला जाईल, अशी तंबी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध ठिकाणच्या बैठकांत दिली. 

कल्याण, पालघर, भिवंडी, रायगड आदींसह राज्यात विविध लोकसभा मतदारसंघात शिंदेसेना अथवा अजित पवार गटाला उमेदवारी मिळाल्याने किंवा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याचे बावनकुळे यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी आमदार व नगरसेवकांच्या बैठका घेऊन कुणाचीही नाराजी, मतभेद असतील तर ते तातडीने मिटवावेत. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाला पाहिजे, असे आदेश दिले. लोकसभेची प्रत्येक जागा पक्षासाठी महत्त्वाची असल्याने कुणाच्याही नाराजीचा निकालावर परिणाम होऊ नये. तसे होणे हे पक्षाला अपेक्षित नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

डिसेंबर, जानेवारीमध्ये विधानसभानिहाय दौरा करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम झाले आहे की नाही? ६०० जणांना बूथ रचनेत आणले की नाही, रोज दहा जणांना पक्षाशी जोडले की नाही हे सगळे मतदान किती झाले, यावरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणी सुटणार नाही, सूक्ष्म पातळीवर पाहणी सुरू असून वरिष्ठ स्तरावर सगळी माहिती घेतली जात आहे. जे कोणी उमेदवार असतील ते महायुतीचे उमेदवार आहेत, ते घटक पक्षांचे नाहीत हे सगळ्यांनी लक्षात घेऊन कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार, नगरसेवकांचा स्कोअरबोर्ड - भाजप आमदारांनी लोकसभेच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून द्यावे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी बूथ रचना भक्कम करावी, त्यांचा स्कोअर बोर्ड बूथवर किती मतदान झाले यावरून ठरवण्यात येईल.- कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी काही दिवसांपूर्वी झालेल्या झूम मीटिंगला कल्याण पूर्वेतील काही पदाधिकारी हजर नव्हते. त्याची गंभीर दखल बावनकुळे यांनी घेताच अवघ्या ४८ तासांत कल्याण लोकसभेमधील सर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्यासाठी काम करण्याची तयारी दर्शवली गेली. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBJPभाजपा