कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेसंदर्भात आम्ही ज्या हरकती नोंदविल्या आहेत. त्याची दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दिला आहे.
आज हरकतींवर महापालिका मुख्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी सुनावणीकरीता आमदार गायकवाड हे उपस्थित होते. कल्याण पूर्व भागातील जवळपास 4क्क् पेक्षा जास्त नागरीकांनी प्रभाग रचने संदर्भात हरकती घेतल्या आहेत. आमदार गायकवाड यांनी सांगितले की, प्रभाग रचनेचे नकाशे जूळून येत नाहीत .निवडणूक आयोगाने ज्या गाईड लाईन दिल्या होत्या. त्यानुसार प्रभाग रचनेची सुरुवात नकाशानुसार पूर्व दिशेपासून करणो अपेक्षित होते. पूर्व दिशेपासून सुरुवात केल्यास टिटवाळयापासून सुरुवात होणो गरजचे होते. या प्रभाग रचनेत प्रभाग रचनेची सुरुवात उंबर्डे येथून करण्यात आहे. उंबर्डे प्रभाग हा उत्तर दिशेला आहे.
सत्तेचा गैरवापर करीत सत्ताधा:यानी सूर्य सुद्धा उत्तरेला उगवितो असे समजून त्यांच्या राजकीय सोयीनुसार निवडणूक यंत्रणोला हाताशी धरुन प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने केली असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे. हरकती नोंदवितानाच आमदार गायकवाड यांनी उल्हासनगरचा काही भाग कल्याण डोंबिवली महापालिकेने ढापला असल्याचा आरोप केला होता. प्रभाग रचना शिवसेनेने त्यांच्या सोयी प्रमाणे केल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यापूर्वीच केला होता. त्या पाठोपाठ भाजपचा आरोप आणि हरकत ही देखील याच स्वरुपाची आहे. हरकती ऐकून घेण्यात आल्या असल्या तरी त्याची दखल घेतली नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले.