शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

गणेशोत्सवासाठी रेल्वेने जायचे कसे, तुम्हीच सांगा...तिकिटांचा आढावा घ्या : आ. राजू पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 08:13 IST

गणपतीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकर चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा आधार असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : गणरायाच्या आगमनाच्या दोन दिवस आधीचे म्हणजेच १७ सप्टेंबरचे रेल्वेचे आरक्षण शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांत फुल्ल झाले. कोकण रेल्वे व कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांत आता या दिवसाचे एकही आरक्षित तिकीट शिल्लक नाही. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली असताना दलालांमुळे यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार आहे. या आरक्षित तिकिटांचा आढावा घ्यावा आणि कोकणवासीयांसाठी नवीन गाड्यांचे नियोजन करून कोकणवासीयांच्या कोकण प्रवासाचा ‘श्री गणेशा’ करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली. 

गणपतीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकर चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा आधार असतात. १७ सप्टेंबर या प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले होते. पहिल्याच दिवशी अवघ्या तीन मिनिटांतच आरक्षण पूर्ण झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा आली. यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांच्या नजरा आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांकडे लागल्या आहेत. अद्याप रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नसल्याने आमदार पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आमदार पाटील यांनी कोकणवासीयांच्या व्यथा मांडल्या आहेत. दरम्यान, दलालांमुळे चाकरमान्यांची कोकणची वाट आणखी बिकट होत चालली आहे. 

दलालांच्या हातात सर्व आरक्षण यंत्रणारेल्वे मंत्रालय याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही. दलालांच्या हातात सर्व आरक्षण यंत्रणा असून, परराज्यातून सर्रास तिकीट बुक होतात. सर्व रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन आताच करून गौरी गणपतीनिमित्त जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षण मिळवून द्यावे आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी आमदार पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेGaneshotsavगणेशोत्सवRaju Patilराजू पाटील