- मुरलीधर भवारकल्याण - कल्याण रेल्वे स्थानकात आज दुपारी दोन वाजता एक अनोळखी व्यक्ती रेल्वे ओव्हर हेड वायर पोलवर चढल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याला खाली उतरवण्यासाठी रेल्वे पोलीस आरपीएफ आणि सुरक्षा रक्षक यांनी खूप प्रयत्न केले. अखेरीस ओवर हेड वायरच्या धक्क्याने तो खाली पडला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी प्रथम कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या शीव रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दुपारच्या सुमारास रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक नजीक ओव्हरहेड वायरच्या पोलवर हा अनोळखी व्यक्ती चढला. त्यानंतर तो फलाट क्रमांक दोन आणि फलाट क्रमांक तीनच्या दिशेने पोल वरून पुढे गेला. त्याला खाली उतरवण्यासाठी आरपीएफ आणि रेल्वे पोलीस प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यांना तो काही एक प्रकारे दात देत नव्हता. अखेरीस त्याने फोनची मागणी केली. त्याला फोन देण्यात आला. मात्र तो फोन त्याने खिशात ठेवला. त्यानंतर काही वेळाने तो फोन त्याने खाली फेकून दिला. ओवर हेड वायरच्या धक्क्याने त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून काही वेळेसाठी रेल्वे स्थानकातील वीज पुरवठा खंडित करण्यात. रेल्वे स्थानकात उपनगरीय गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या यांचा खोळंबा झाला. दोन तासानंतर फलाट क्रमांक चारवर वंदे भारत एक्सप्रेस आली. याचवेळी स्थानकातील प्रवाशांनी हा सगळा प्रकार बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. ही गर्दी पोलिसांनी दूर केली.
थोड्याच वेळात वंदे भारत एक्सप्रेस स्थानकातून पास झाली. त्याचवेळी पोलवर चढलेला व्यक्ती विजेच्या झटक्याने खाली कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याने हे का कृत्य केले? त्याला आत्महत्या करायची होती का? का तो माथेफिरू होता. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासानंतर समोर येणार आहेत. कारण त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
Web Summary : An unidentified man climbed an overhead wire pole at Kalyan station, causing disruption. Despite police efforts, he fell after an electric shock and was seriously injured. Train services were delayed. He was moved to a Mumbai hospital.
Web Summary : कल्याण स्टेशन पर एक अज्ञात व्यक्ति ओवरहेड वायर के खंभे पर चढ़ गया, जिससे व्यवधान उत्पन्न हुआ। पुलिस के प्रयासों के बावजूद, बिजली के झटके के बाद वह गिर गया और गंभीर रूप से घायल हो गया। ट्रेन सेवाएं बाधित हुईं। उसे मुंबई के एक अस्पताल में ले जाया गया।