शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापिकेने मुलीच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीला जाळले, मृत्यूनंतर पत्नीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 08:52 IST

दोन तरुणांचा शोध

कल्याण : मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीने मुलीच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळले. त्यामुळे घराला आग लागली. उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला. पतीच्या हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पत्नी अश्विनी पवार हिला अटक केली आहे. तर दोन तरुणांचा पोलिस शोध घेत आहेत.

विजयनगर परिसरातील विशालनगरी कॉम्प्लेक्समध्ये हरिश्चंद्र हे आपली पत्नी अश्विनी व दोन मुलींसह राहत होते. खासगी सुरक्षारक्षक असलेले हरिश्चंद्र काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी अश्विनी कल्याणमधील एका शाळेत मुख्याध्यापिका आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे, तर लहान मुलगी ही घरीच असते. हरिश्चंद्र व पत्नी अश्विनी यांच्यात नेहमी वाद व्हायचे.

शुक्रवारी रात्रीही या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी अश्विनी यांच्या मुलीचे दोन मित्रही घरात होते. रागाच्या भरत अश्विनी यांनी हरिश्चंद्र यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला. क्षणार्धात हरिश्चंद्र भाजले. गंभीर जखमी झालेल्या हरिश्चंद्र यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पती-पत्नीमध्ये पेन्शनच्या पैशांवरून वाद होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली, मात्र पोलिसांकडून याबाबत दुजोरा मिळाला नाही.