शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचे केडीएमसीच्या विरोधात हंडा कळशी उपोषण

By मुरलीधर भवार | Updated: November 6, 2023 16:19 IST

जोपर्यंत पाणी समस्या सूटत नाही. ताेपर्यंत हे बेमुदत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा कपोते यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

कल्याण - कल्याण शहरातील पश्चिम भागातील काही प्रभागात पाण्याची समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या कल्पना कपोते यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात आज पासून हंडा कळशी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात पाणी टंचाईपासून त्रस्त असलेल्या महिलाही सहभागी झालेल्या आहेत. जोपर्यंत पाणी समस्या सूटत नाही. ताेपर्यंत हे बेमुदत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा कपोते यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

शहराच्या पश्चिम भागीतल पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या जुन्या आहेत. ४० वर्षे झाली तरी त्याची देखभाल दुरुस्ती केली गेलेली नाही. या जलवाहिनी काही ठिकाणी गटारातून गेलल्या आहेत. त्यामुळे नागरीकांनी गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या भागाला होणारा पाणी पुरवठा अनियमित स्वरुपाचा आहे. तसेच पाण्याचा दाब कमी असतो. त्यामुळे नागरीकाना पुरेसे पाणी मिळत नाही. जे काही पाणी मिळते ते देखील दूषित आणि गढूळ असते. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरीकांना त्वचा रोग होत आहेत. महापालिका नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा करु शकत नाही. ही महापालिका प्रशासनाकरीता लाजीरवाणी गोष्ट आहे. नागरीकांकडून मालमत्ता कर वसूल केला जातो. तसेच पाणी पुरवठा नियमित केला जात नसताना पाण्याची बिले नागरीकांच्या घरी पाठविली जातात. या विविध मुद्यांकडे कपाेते यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

कपोते या ज्याठिकाणी बेमुदत उपोषण करीत आहे. त्यांच्या शेजारीच खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक यांनी देखील एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. वनश्री संकूल, भाेईर कन्स्ट्रक्शन, परिसर, भगवानननगर, जय आंबे, पंचमुखी, शेलार रेसीडेन्सी, आराधना सोसायटी, जय संतोषी माता, श्रीकृष्ण दर्शन या परिसरातील नागरीकांना अनियमित आणि दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. ही समस्या सोडविण्यात यावी अन्यथा येत्या १३ तारखेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा बोरगांवकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणStrikeसंपwater shortageपाणीकपातdombivaliडोंबिवली