शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची पंचविशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:41 IST

डोंबिवली पूर्वेला १९९८ मध्ये मदन ठाकरे चौकात ३१ डिसेंबर साजरा करण्यात आला.

- प्रवीण दुधे, (कार्यवाह, गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली)

गेल्या काही वर्षांत ३१ डिसेंबर, व्हॅलेंटाइन डेचे वाढते प्रस्थ पाहता हिंदू संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे. या पाश्चिमात्य संस्कृतीच्या पगड्याला विरोध न करता एखादा पर्याय द्यावा, या उदात्त हेतूने श्री गणेश मंदिर संस्थानाने गुढी पाडव्याचे औचित्य साधत हिंदू नववर्षानिमित्त लोकसहभागातून स्वागतयात्रेची संकल्पना उदयास आणली. केवळ मिरवणूक काढून नववर्षाचे स्वागत करणे हा स्वागतयात्रेचा मूळ उद्देश न राहता त्यातून संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच विविध उपक्रम आणि सामाजिक संदेशाद्वारे बांधीलकी जपली आहे. १९९९ ला प्रारंभ झालेल्या या ‘गावकीच्या उत्सवाचे’ यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

डोंबिवली पूर्वेला १९९८ मध्ये मदन ठाकरे चौकात ३१ डिसेंबर साजरा करण्यात आला. डोंबिवलीकर प्रेमी आणि सामाजिक जाण असलेल्यांनी तो प्रकार पाहिला. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, मधुकर चक्रदेव आणि सुरेंद्र वाजपेयी यांच्यापर्यंत ही घटना पोहोचली. ३१ डिसेंबरचे प्रस्थ वाढत गेले तर शहराचे चित्र पालटू शकते, अशी भीती त्यावेळी व्यक्त झाली. दत्तनगरमध्ये बैठक झाली. ३१ डिसेंबर या पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण पाहता वेगळा पर्याय देणे आवश्यक असल्याने ‘हिंदू नववर्षाची स्वागतयात्रा’ ही संकल्पना सुरू करण्याचा विचार मांडण्यात आला. उपक्रम सर्वसमावेशक असला पाहिजे, यात राजकीय तसेच कोणत्याही ज्ञातिभावना येऊ नये याकडेही लक्ष वेधले गेले. उपक्रमाचे प्रतिनिधित्व श्री गणेश मंदिर संस्थानने करावे, असाही निर्णय झाला.

दांडगा लोकसंपर्क असलेले आबासाहेब पटवारी हे त्यावेळी श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष होते. अन्य विश्वस्तांची बैठक झाली आणि स्वागतयात्रेच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली. शहरातील सर्व धार्मिक संस्थांना, सांप्रदायांनाही आवाहन पत्रके वाटण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही संकल्पना पोहोचावी म्हणून शहरातील शैक्षणिक संस्थांची मदत घेण्यात आली. बालगोपाळांना आकर्षण वाटावे म्हणून नववर्षाच्या पूर्वसंध्येला आतषबाजी आयोजित करण्यात आली. हजारो नागरिकांच्या सहभागाने वेगवेगळ्या विषयांवरील चित्ररथांनी, कलापथके आणि मेळ्यांनी निघणारी नववर्ष स्वागत शोभायात्रा आजही शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे. 

गेल्या २४ वर्षांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, दिग्दर्शक राजदत्त, माजी सरसंघचालक के. सुदर्शन, पुणे पीठाचे स्वामी स्वरूपानंद, साध्वी ऋतुंबरा, अभिनेते मोहन जोशी, आयपीएस अधिकारी वाय. सी. पवार, दा. कृ. सोमण यांच्यासह इतर महनीय व्यक्तींनी उपस्थिती लावली आहे. स्वागतयात्रेचे यंदाचे वर्ष रौप्यमहोत्सवी आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आजवरच्या सर्व विश्वस्तांचे मोठे योगदान लाभले आहे. 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाMumbaiमुंबई