शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडी निघाली आजोबांच्या भेटीला! एकटीच बसली होती लोकलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:01 IST

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात रविवारी रात्री ९च्या सुमारास कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलिसाची नजर लोकलमधून उतरणाऱ्या एका लहान मुलीवर गेली. सध्या ऑपरेशन मुस्कान सुरू असल्याने पोलीस लहान मुलांवर नजर ठेवून आहेत. 

 कल्याण : आजी-आजोबांची आठवण आली, म्हणून एक सात वर्षांची मुलगी एकटीच लोकलमध्ये बसली, परंतु कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या बेपत्ता मुलीचा शोध लागला. रेल्वे स्थानकात निदर्शनास पडताच, चौकशीअंती तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.कल्याण रेल्वे स्थानकात रविवारी रात्री ९च्या सुमारास कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलिसाची नजर लोकलमधून उतरणाऱ्या एका लहान मुलीवर गेली. सध्या ऑपरेशन मुस्कान सुरू असल्याने पोलीस लहान मुलांवर नजर ठेवून आहेत. ती मुलगी ट्रेनमधून उतरताच त्याने तिची विचारपूस केली. मात्र, मुलगी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना तिला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी वायरलेसद्वारे याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली.त्याच दरम्यान मुंब्रा पोलिसात काजल तिवारी (वय ७) ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली गेली होती. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी त्वरित दखल घेत मुलीचा शोध सुरू केला होता. अखेर कल्याण स्टेशनला रेल्वे पोलिसांना सापडलेली मुलगी ही काजलच असल्याचे चौकशीअंती पुढे आले. सोमवारी सकाळी तिला तिच्या मोठ्या बहिणीच्या तब्यात देण्यात आले.नातेवाइकांसोबत नेहमी ट्रेनने प्रवासकाजलचे आजी-आजोबा, आई, वडील हे अंबरनाथला राहतात, तर बहीण ही दिव्याला राहते. ती नेहमी अंबरनाथ आणि दिवा या दरम्यान नातेवाइकांसोबत ये-जा करते. रविवारी रात्री तिला आजी-आजोबांची आठवण झाली. त्यामुळे ती कशी तरी दिवा स्थानकात येऊन ट्रेनमध्ये बसली आणि कल्याण स्थानकात तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा शोध लागल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Familyपरिवारcentral railwayमध्य रेल्वेkalyanकल्याण