शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पीएम स्वनिधीला राष्ट्रीयीकृत बँकांकडून खोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:10 IST

Dombivali News : राष्ट्रीयीकृत बँकांच्या नियोजनशून्य आणि उदासीन कारभारात थोड्याच फेरीवाल्यांना या कर्जयोजनेचा लाभ मिळाल्याने पीएम स्वनिधीला राष्ट्रीयीकृत बँकांचा खोडा बसल्याचे स्पष्ट होत आहे.

- प्रशांत मानेकल्याण :  कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीत रोजगार बुडाल्याने रोजंदारी करणाऱ्यांना कर्ज स्वरूपात आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली. रस्त्यावर ठेला लावणाऱ्या फेरीवाल्यांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिका स्तरावर ही योजना राबविण्यात आली. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांच्या नियोजनशून्य आणि उदासीन कारभारात थोड्याच फेरीवाल्यांना या कर्जयोजनेचा लाभ मिळाल्याने पीएम स्वनिधीला राष्ट्रीयीकृत बँकांचा खोडा बसल्याचे स्पष्ट होत आहे.केडीएमसीच्या २०१४ मध्ये झालेल्या फेरीवाला विभागाच्या सर्वेक्षणात नऊ हजार ७३ फेरीवाल्यांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या वतीने १० प्रभाग क्षेत्रांमध्ये राबवलेल्या पीएम स्वनिधी योजनेतून १४ हजार ९७० फेरीवाल्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट केंद्राने दिले होते. पालिकेने सर्व्हेत सहा हजार ६०१ फेरीवाल्यांचे अर्ज आले. त्यातील दाेन हजार ५९७ जणांचे अर्ज मंजूर झाले. यात दाेन हजार १९१ जणांचे अर्ज मंजूर केले असून एक हजार १९८ जणांनाच १० हजार रुपये कर्जाचा लाभ झाला.बँकांचे मौनबँकांवर कर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी होती. पण आमच्याकडे कर्मचारी नाहीत. आमची बँक दुसऱ्या बँकेत विलीन होणार आहे अशी सबब देऊन बँका टाळाटाळ करीत होत्या. तसेच क्षुल्लक कारणावरून अर्ज नामंजूर केले जात होते, अशा तक्रारी फेरीवाल्यांच्या होत्या. याबाबत मात्र काहीही भाष्य करण्यास राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दिला आहे. अर्ज करूनही कर्ज न मिळाल्याने झाला अपेक्षाभंग ! लॉकडाऊनमध्ये रोजगार पूर्णपणे बुडाल्याने उपासमारीची वेळ कुटुंबावर ओढावली. धंदा पुन्हा करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. पीएम स्वनिधीच्या माध्यमातून थोडाफार हातभार लागेल, अशी अपेक्षा होती. पण, अर्ज करूनही कर्ज उपलब्ध न झाल्याने अपेक्षा फोल ठरली आहे.- राजू गुप्ता, फेरीवालामहापालिकेकडून अर्ज भरून घेण्यात आले. पण बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे कर्ज उपलब्ध होऊ शकले नाही. दरम्यान अर्थसाहाय्य मिळण्यासाठी ही योजना फायदेशीर होती. कर्ज फेडण्याचे जे नियम दिले होते ते सोयीस्कर नव्हते, त्यामुळे आम्हा फेरीवाल्यांचा पुरता हिरमोड झाला आहे.- संजय चव्हाण, फेरीवाला पीएम स्वनिधी योजनेतून अर्ज करूनही आजतागायत कर्ज मंजूर झालेले नाही. लॉकडाऊनमध्ये एकूणच झालेले नुकसान पाहता कर्जाची रक्कम १० हजारांहून अधिक असणे गरजेचे होते. पण आजच्या घडीला १० हजारांचे कर्जही मिळू शकलेले नाही.- परेश जाधव,  फेरीवाला

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBanking Sectorबँकिंग क्षेत्र