शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात टोळक्याकडून १० गाडयांची तोडफोड, ट्रक चालकाला मारहाण, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:33 IST

- सदानंद नाईक    उल्हासनगर : कॅम्प नं-४, गीता कॉलनी परिसरात एका टोळक्याने मंगळवारी पहाटे ५ वाजता १० पेक्षा जास्त ...

- सदानंद नाईक  उल्हासनगर : कॅम्प नं-४, गीता कॉलनी परिसरात एका टोळक्याने मंगळवारी पहाटे ५ वाजता १० पेक्षा जास्त गाड्याची तोडफोड करून एका ट्रक चालकाला मारहाण झाली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस टोक्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी दिली.

 उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील एका गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत दोन गटात वाद झाला होता. त्यातील एका गटाच्या ७ ते ८ जणांच्या टोळक्याने, मंगळवारी पहाटे ५ वाजता गीता कॉलनी येथील रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी, कार, रिक्षा व ट्रक अश्या १० पेक्षा जास्त वाहनाची तोडफोड केली. तसेच एका ट्रक चालकाला मारहाण करून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. सोमवारी अश्याच गाड्याची तोडफोड करणाऱ्या एका गुंडाला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक करून आशेळेगाव परिसरातून धिंड काढली. पोलिसांनी गुंडाची धिंड काढुनही गुन्हेगारावर याचा परिणाम होत नसल्याने, वाहनाची तोडफोडीचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

वाहनाची नुकसान झालेल्या वाहचालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला प्रकार पोलिसांना कथन केला. विठ्ठलवाडी पोलिसांनी गीता कॉलनीत जाऊन, तोडफोड झालेल्या वाहनाची पाहणी केली. तसेच मारहाणीत जखमी झालेल्या ट्रक चालकाला रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वाहनाची तोडफोड करणाऱ्या टोळक्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे याप्रकरणी तपास करीत असून लवकरच गुन्हेगार जेरबंद होण्याचे संकेत दिले. गोडसे यांनी सोमवारी अश्याच आशेळेगाव येथे वाहनाची तोडफोड करणाऱ्या एका गुंडाला अटक करून त्याची परिसरसातून धिंड काढली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगर