शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या भोंगळ कारभारामुळे बाप्पाचे विसर्जन वेटिंगला, गणेश भक्तांनी व्यक्त केला तीव्र संताप

By मुरलीधर भवार | Updated: September 20, 2023 21:27 IST

या प्रकारामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनीही त्याठिकाणाहून परत जाणे पसंत केले.

कल्याण - कल्याण डाेंबिवली महापलिकेने गणेश विसर्जनासाठी चोक व्यवस्था केली असल्याचा दावा केला होता. मात्र महाालिकेचा हा दावा कल्याण पश्चिमेतील केडीएमटी बस डेपोजवळ असलेल्या गणेश विसर्जन घाटावर फोल ठरला आहे. या ठिकाणी आलेल्या गणेश मूर्त्या विसर्जन करण्याकरीता पाण्यात उतरणारे कामगार नसल्याने बाप्पांना विसर्जनासाठी वेटिंगला राहावे लागले. अखेरी संतप्त गणेश भक्तांनी त्यांच्या गणेशाला निरोप देण्यासाठी दुसरीकडेचे विसर्जन स्थल गाठले. या प्रकारामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनीही त्याठिकाणाहून परत जाणे पसंत केले.

महाापलिकेने केडीएमटी बस डेपोजवळील गणेश घाटावर विसर्जनाची व्यवस्था केली होती. आज दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन असल्याने अनेक गणेश भक्त त्यांच्या घरातील बाप्पाची मू्र्ती घेऊन गणेश घाटावर पोहचले. त्याठिकाणी त्यांनी आरत्या सुद्धा घेतल्या. मात्र गणेश मूर्ती विसर्जनासाठी कोणाच्या हाती द्यायची यासाठी जबाबदार व्यक्तीच नसल्याने त्यांची घोर निराशा झाली.

या ठिकाणी विसर्जनाकरीता आलेल्या विद्या गोळे यांनी सांगितले, याठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी आले होते. त्याठिकाणी विसर्जनासाठी मुले नव्हती. मूर्ती ठेवण्याकरीता कठडा देखील नव्हता. दर वर्षी आम्ही विसर्जनाकरीता येतो. तेव्हा व्यवस्था असते. यंदा व्यवस्था नसल्याने आम्हाला बाप्पाची मूर्ती घेऊन परत माघारी फिरावे लागले. दुसऱ््या ठिकाणी बाप्पांचे विसर्जन करणार आहे.

किरण खाडे हे देखील विसर्जनाकरीता त्यांच्या बाप्पाची मूर्ती घेऊन आले होते. आरती केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्याठिकाणी मूर्ती विसर्जनाकरीता मुले नाहीत. घारात बाप्पाचे दीड दिवस पूजन केले. त्यांचा अवमान महापालिकेकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांनी सांगितले की, याठिकाणी आमचा पोलिस बंदोबस्त आहे. मात्र मूर्ती विसर्जनाकरीता मुले नसल्याने एखादा विसर्जनाच्या वेळी कोणी बुडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार. विजेसह जनरेट लावला आहे. त्याठिकाणी अग्नीशमन दलाचे दोन तरुण होते. मूख्य व्यवस्थाच नव्हती.

याठिकाणी अन्य लोकही विसर्जनाकरीता आले. मात्र त्याठिकाणी व्यवस्थाच नसल्याने त्यांनाही माघारी फिरावे लागले. अखेरीस या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसही निघून गेले.याठिकाणी महापालिकेने गणेश भक्तांचे स्वागत करणारा फलक लावला होता. त्यात कृत्रिम तलावाची व्यवस्था केली असल्याचा उल्लेख होता. त्याठिकाणी कृत्रिम तलावच नव्हता. महापालिका कर्मचाऱ््यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले आमच्यावर केवळ स्वच्छतेचेची जबाबदारी दिली गेली आहे.या संदर्भात महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना ही बाब कळताच त्यांनी या प्रकरणात तातडीने दखल घेऊन काय झाले आहे ते पाहते असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका