शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तोतया टीसीला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी केली अटक

By अनिकेत घमंडी | Updated: August 25, 2023 10:28 IST

डोंबिवली ते दिवा लोकल गाड्यात तपासायचा तिकीट, टीसी भासवून प्रवाशांची दिशाभूल.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: दिवा रेल्वे स्थानकात रेल्वेचा टीसी असल्याचे भासवून लोकल गाड्यात डोंबिवली कोपर दिवा मार्गावर प्रवाशांची दिशाभूल करून अवैध दंड आकारणार्या तोतया टीसीसंदर्भात स्थानक प्रबंधक कार्यालयात तक्रार आल्याची घटना गुरुवारी घडली, त्यानुसार एका संशयिताची चौकशी करून तो तोतया असल्याचे स्पष्ट झाल्यावर आधी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून रात्री तो डोंबिवलीत वर्ग करून त्या तोतया इसमाला अटक केली. दिवा स्थानक प्रबंधकांनी रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेला दिलेल्या माहितीनंतर हा सगळा बनावट प्रकार उघडकीस आला.

त्यानूसार पोलिसांनी विजय बहादूर सिंह,(२१) रा. गणेशनगर ऐरोली, नवी मुंबई मूळ पत्ता जौनपूर, यूपी याची दिवा स्थानकातील हेड कॉन्स्टेबलने यांनी प्राथमिक चौकशी केली. तसेच मुख्य तिकीट निरीक्षक, मुंबई प्रमोद एच सरगईया यांच्याशी चर्चा करून माहिती घेतल्यावर खातरजमा करून तो सिंह तोतया असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडे टीसीचे बनावट आयकार्ड देखील आढळून आले. त्यानूसार त्याची लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील यांनी कसून चौकशी केली, त्याला ताब्यात घेऊन ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्याच्यावर गुन्हा नोंदवून डोंबिवली हद्दीत घटना घडली असल्याने गुन्हा वर्ग करून त्याला पुढील चौकशीसाठी गुरुवारी रात्री तेथे पाठवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्यांनी दिली.  तो तोतया टीसीसंदर्भातील गुन्हा ठाणे लोहमार्ग पोलिसांनी डोंबिवली ते दिवा मार्गावरील।लोकलमध्ये घडल्याने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला असून त्याला गुरुवारी रात्री अटक।केली असून शुक्रवारी रेल्वे न्यायालयात पाठवण्यात येणार आहे : अर्चना दुसाने, वरिष्ठ।पोलीस निरीक्षक, डोंबिवली लोहमार्ग पोलीस

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारीcentral railwayमध्य रेल्वे