शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

पाच रेल्वे स्थानकांत पुरातून सुटकेकरिता मदत दल तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 09:12 IST

माटुंगा, शीव, कुर्ला, ठाणे, बदलापूर स्थानकांत बोटीतून प्रवाशांची करणार सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकच्या चोहोबाजूने तुफान पाणी साचले आहे. अशावेळी बोटीतून प्रवाशांची सुटका करण्याकरिता येणारे पूर मदत दल (आरएफआरटी) हे देवदूतांसारखे भासते. पावसाळ्यात माटुंगा, शीव, कुर्ला, ठाणे, बदलापूर या सखल भागातील रेल्वे स्थानकांमध्ये पाच बोटी व पूर मदत दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. पावसाळी पाण्यातून ते प्रवाशांची कशी सुटका करणार, याचे मॉकड्रिल मंगळवारी ठाण्यातील तलावपाळी येथे पार पडले. मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कंसल यावेळी हजर होते.

दोन वर्षांपूर्वी उल्हास नदीला मुसळधार पूर आल्याने बदलापूरजवळ रेल्वे अडकली होती. त्यामधील प्रवाशांची सुटका करण्यास बऱ्याच विलंबाने एनडीआरएफची पथके दाखल झाली. मागील आठवड्यात पहिल्याच पावसात शीव, कुर्ला भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनांमधून धडा घेऊन रेल्वे प्रशासनाने आता बोटी तैनात केल्या आहेत, असे कंसल म्हणाले. प्रत्येक रेल्वे स्थानकापाशी पाच जणांचा समूह हजर राहणार आहे. प्रत्येक पूर मदत दलात एक उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक आणि ६ इतर कर्मचारी असतात. आतापर्यंत १५ आरपीएफ कर्मचारी (५ महिला आणि १० पुरुष) यांना पुणे एनडीआरएफकडून प्रशिक्षण मिळाले आहे. त्यानुसार आता आरपीएफ जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे.

ही टीम प्रत्येक पावसाळ्यात दरवर्षी जून ते ऑक्टोबरदरम्यान तत्पर असते. ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, अशा ठिकाणी किंवा पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिलेला असेल तेव्हा पथक तैनात केले जाईल. हे पथक नागरी प्रशासन, जीआरपी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि नियंत्रण कक्ष यांच्या संपर्कात असेल. आरपीएफने रेल्वे पूर मदत दलासाठी एसओपी (नियोजन) तयार केली आहे.आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार म्हणाले की, रेल्वेच्या पूर मदत पथक बचाव व मदत कार्यात हे पथक मोलाची कामगिरी बजावेल.

असे आहे पूर मदत पथकाचे कार्य...ब्ल्यू  अलर्ट : जेव्हा पाण्याची पातळी रेल्वे रुळांवर चार इंचाच्या वर पोहोचते, तेव्हा पूर मदत दल सक्रिय होते.ऑरेंज अलर्ट : पाण्याची पातळी रेल्वे रुळांपासून पाच इंचाच्या वर पोहोचते, तेव्हा दल स्थळापाशी दाखल होते.रेड अलर्ट : जेव्हा कोणत्याही स्थानकावर पावसाळी पाण्यामुळे ट्रेन थांबवली जाते तेव्हा त्या ठिकाणी पाण्याची पातळी तीन फूट आहे याची खात्री करून मदतकार्य सुरू करते.

टॅग्स :localलोकलRainपाऊस