शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक: कल्याण डोंबिवलीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

By प्रशांत माने | Updated: April 17, 2024 17:17 IST

होर्डींग्ज काढताना मनपा कर्मचा-यांची झाली दमछाक

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवलीत पहिला गुन्हा दाखल झाला आहे. परवानगी न घेता राजकीय पक्षाचे होर्डींग्ज लावल्याप्रकरणी जाहिरात एजन्सीविरोधात येथील मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. केडीएमसीचे ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. विशेष बाब म्हणजे १० ते १२ मजली उंचीवर असलेले ४० बाय ४० फुट लांबीचे होर्डींग्ज काढण्यासाठी अग्निशमन विभागाची शिडी असलेला बंब मागविण्यात आला होता.

गुरूवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास निवडणुक विभागाच्या अॅपवर परवानगी विना होर्डींग्ज लावण्यात आला आहे अशी तक्रार आली. तक्रारीत नोंदविलेल्या ठिकाणाचा पत्ता शोधत असताना डोंबिवली पुर्वेकडील कल्याण शिळ रोड, साई सिटी निळजे, याठिकाणी रस्त्यालगत लोखंडी साच्यावर १० ते १२ मजली उंच असा ४० बाय ४० फुट लांबी रूंदी आकाराचा होर्डींग्ज लावलेला आढळुन आला. ४ कोटी पक्की घरे, बांधली आहेत, आणखी बांधली जातील मोदीची गॅरंटी, पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करा असे त्या होर्डींग्जवर लिहिले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र देखील होते. घटनास्थळी दाखल झालेले केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी मालमत्ता विभागाकडे या होर्डींग्ज बाबत चौकशी केली असता त्यांच्याकडून संबंधित होर्डींग्जची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समजले. दरम्यान आचारसंहिता भंग करून मालमत्ता विद्रुपिकरण केल्याच्या आरोपाखाली सहाय्यक आयुक्त पवार यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ए.डि.प्रमोशन अॅडव्हरटायझींग सर्व्हिसेस यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

होर्डींग्ज काढताना मनपा कर्मचा-यांची झाली दमछाक

साधारण १५ मजली उंचीवर तसेच ४० बाय ४० असा भलामोठा संबंधित होर्डींग्ज काढताना केडीएमसीच्या कर्मचा-यांची चांगलीच दमछाक झाली. शिडी असलेली अग्निशमन विभागाचा बंबगाडी मागविण्यात आली होती.पण तीचाही उपयोग झाला नाही. अखेर कर्मचा-यांनी कसबसे ते होर्डींग्ज काढून ते ताब्यात घेतले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४