शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील लक्ष्मी निवास इमारतीला आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 16:59 IST

Fire at Lakshmi Niwas building in Dombivali: डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या लक्ष्मी निवास या इमारतीला गुरुवारी दुपारी तीन वाजता आग लागल्याची घटना घडली आहे.

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या लक्ष्मी निवास या इमारतीला गुरुवारी दुपारी तीन वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर प्लास्टिकचे गोडाऊन  असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमुळे परिसरात काळ धुराचे लोट पसरले होते .ऐन दुपारच्या वेळेस रहदारीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले होते. (Fire at Lakshmi Niwas building in Dombivali)

केडीएमसी प्रशासनाने ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती. मात्र या इमारतीमधील काही दुकाने सुरू होती. आग लागल्याचे समजताच दुकानदारांनी दुकानं बंद करून पळ काढला. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने  आजूबाजूच्या इमारतीमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.  अग्निशमन दलाच्या जवानांनी आग  विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

दुसरा मजल्यावर  काही दुकानदारांनी ,फेरीवाल्यानी आपला माल ठेवला होता याच मालाला आग लागली मात्र आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीfireआग