शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

वायफाय राऊटरच्या एक्सपॅन स्वीचमध्ये स्फोट, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 09:01 IST

कल्याणमधील घटना; महिला ८० टक्के, ३ महिन्यांचा मुलगा ५० टक्के भाजला

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील रामदेव चाैधरी चाळीतील वायफाय  राऊटरच्या कनेक्शनला सप्लाय करणाऱ्या एक्सपॅन स्वीचचा स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाप्रकरणी केबल चालकाविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदेव चौधरी चाळीत राहणाऱ्या सायमा शेख यांच्या घराबाहेर  शनिवारी संध्याकाळी ६ वाजता वायफायच्या राऊटरला सप्लाय करणाऱ्या एक्सपॅन स्वीचचा स्फोट झाला. यामळे लागलेल्या आगीत सायमा यांची १० वर्षांची मुलगी नाजमीनचा चेहरा आणि दोन्ही हात भाजले. सायमा यांच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या नगमा अन्सारी या ८० टक्के भाजल्या आहेत. तर त्यांचा तीन महिन्यांचा लहान मुलगा अरमानही ५० टक्के भाजला आहे. या दोघांना ऐरोली येथील बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

काळजी घ्याअनेकांच्या घरात केबलचा वायफाय राऊटर आहे तसेच त्याला सप्लाय देणारे एक्सपॅन स्वीचही एका ठिकाणी बसविलेले असते तेथेही अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळजीने अनेक जण धास्तावले आहेत.

शॉर्टसर्किटमुळे स्फोट?    कल्याणमधील केबल व्यावसायिक असलेले जगदीश खरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, वायफाय राऊटर सप्लाय एक्सपॅन स्वीच याच्या क्वालिटीचा प्रश्न उद्धवत नाही. ते चांगल्या कंपनीचेच असते. मात्र, ज्या ठिकाणी घटना घडली ते पाहता शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाला असावा.     त्याचबरोबर काही वेळेस विजेचा पुरवठा कमी-जास्त दाबाने  होतो. अचानक विजेचा पुरवठा जास्त दाबाने सुरू झाला तर अशा  प्रकारे स्वीचचा स्फोट होऊ शकतो.

सुरक्षेची केली नाही उपाययोजनाटिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गीते यांच्याकडे या प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या स्फोटाच्या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी केबलचालक राजू  म्हात्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केबल चालकाने राऊटर सप्लायचे एक्सपॅन स्वीच चाळीच्या बाहेर लावले होते. हे लावत असताना सुरक्षेची कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. वायफाय राऊटरला सप्लाय करणारे एक्सपॅन स्वीच हे कोणत्या कंपनीचे होते? ते निकृष्ट दर्जाचे होते का? त्याची देखभाल दुरुस्ती केली गेली होती की नाही? याविषयी काहीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही गीते यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Blastस्फोट