शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! घराला कडी लावून माजी कुलगुरूंना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 10:53 IST

कल्याणमधील प्रकार; दोषींवर कठोर कारवाई करण्याची ठाकरे गटाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याणमध्ये राहणारे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोक प्रधान यांच्या घरात घुसून पाच जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कुलगुरू प्रधान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

ज्या व्यक्तीने प्रधान यांना मारहाण केली. तो एका शाळेत शिक्षक असून त्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई प्रधान यांच्यामुळे झाली असल्याचा संशय संबंधिताला आहे. त्यातून हा प्रकार घडला.

‘मारहाण करणाऱ्यांना सोडू नका’कुलगुरू प्रधान यांचे वय ८४ वर्षे आहे. त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पद भूषवले आहे. संजय भागवंत जाधव हा इसम त्यांच्या घरात शिरला. संदेश जाधव, आणि पाच जणांनी प्रधान यांच्या घरात प्रवेश करून त्यांना मारहाण केली. प्रधान यांनी घराबाहेर पडू नये यासाठी घराची कडी बाहेरून लावून घेतली होती. शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ हसदास, शहर प्रमुख सचिन बासरे, प्रथमेश पुण्यार्थी यांनी प्रधान यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात, अशी मागणी केली.

चाकू आणि रिव्हाॅल्व्हरचाही दाखविला धाक n ठाकरे गटाच्या मते, प्रधान यांनी दिलेल्या तक्रार ही त्रोटक आहे. प्रधान यांना मारहाण करून चाकू आणि रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखविला गेला. n मारहाण होत असताना प्रधान यांचा मोबाइल हिसकावून घेण्यात आला. जेणेकरून प्रधान यांनी पोलिसांना तक्रार करता येऊ नये. तसेच त्यांच्याकडे पैशाची मागणी केली गेली. n इतक्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत असे प्रकार घडत असल्याने आम्हाला या शहरात राहण्याची लाज वाटते, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण