शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

मृत्यूनंतरही ‘आप कतार में हैं’; ठाण्यात जवाहर स्मशानभूमीत जनरेटरअभावी अंत्यसंस्कारांचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 08:35 IST

अजित मांडके/विशाल हळदे  लोकमत न्यूज नेटवर्क  ठाणे : दोन वर्षांपूर्वी अत्याधुनिक स्वरूपात सुरू झालेल्या जवाहरबाग स्मशानभूमीत चार विद्युत दाहिनी ...

अजित मांडके/विशाल हळदे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : दोन वर्षांपूर्वी अत्याधुनिक स्वरूपात सुरू झालेल्या जवाहरबाग स्मशानभूमीत चार विद्युत दाहिनी आहेत, परंतु जनरेटरची व्यवस्था नसल्याने अंत्यसंस्कारावेळी अचानक वीज गेली, तर वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत मृतांच्या नातलगांना प्रतीक्षा करावी लागते. गुरुवारी एक कुटुंब अंत्यसंस्कारासाठी आले असताना, वीजपुरवठा बंद झाला. तब्बल तासभर त्यांना तिष्ठत राहावे लागले. सुदैव एवढेच की, मृतदेह विद्युत दाहिनीत ठेवल्यावर वीजपुरवठा खंडित झाला नाही, अन्यथा मृत्यूनंतरही मृतदेहाची विटंबना होण्याचा संतापजनक प्रकार अनुभवास आला असता. त्यामुळे जवाहरबाग स्मशानभूमीत जनरेटरची सुविधा लागलीच उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. 

ठाणे शहरातील मध्यवर्ती भागातील जुनी स्मशानभूमी ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेली जवाहरबाग स्मशानभूमी ही सर्वांत जुनी स्मशानभूमी आहे. जुन्या स्मशानभूमीच्या जागेच्या चारपट म्हणजेच तीन हजार चौरस मीटर क्षेत्रफळात नवीन स्मशानभूमी उभारली आहे. येथील उष्णता, धूर शोषून घेण्यासाठी चिमणी बसविली आहे. त्यामुळे आसपासच्या भागाला यापूर्वी होणारा त्रास कमी झाला. सद्य:स्थितीत या ठिकाणी चार विद्युत दाहिनी आणि लाकडावरील अंत्यसंस्काराची पाच अशी व्यवस्था आहे. २०२२ च्या सुमारास नव्याने ही स्मशानभूमी सज्ज झाली. या स्मशानभूमीत रोजच्या रोज १० ते १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात.

मृतदेह ठेवताच वीज गायबगुरुवारी सायंकाळी एक कुटुंब अंत्यसंस्कारासाठी आले होते. मृतदेह विद्युत दाहिनीत ठेवणार तोच वीजपुरवठा खंडित झाला. मृतदेह दाहिनीत ठेवून दरवाजा बंद केला नव्हता. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत एक तास गेला. त्यामुळे आलेले कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवार ताटकळले. जनरेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नातलगांनी यावेळी केली. वीजपुरवठा बेभरवशाचा असल्याने महानगर गॅसची वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले होते. गॅस दाहिनीचा पर्याय उपलब्ध झाला, तरी नातलगांना ताटकळावे लागणार नाही. परंतु, गॅस वाहिनी टाकण्याचे पुढे काय झाले ते येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा माहीत नाही.

धुराचा त्रासधुराचा त्रास होऊ नये, म्हणून विविध उपाययोजना केल्या असल्या, तरी आजही येथील आजूबाजूच्या नागरिकांना लाकडापासून होणाऱ्या धुराचा त्रास सहन करावा लागतो. येथील बहुसंख्य पंखे बंद आहेत. तसेच, याठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली जाणार होती. परंतु, ते काम अर्धवट स्थितीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू