शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

 अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर; कल्याण जिल्हाध्यक्षपदी आप्पा शिंदेंची नियुक्ती

By प्रशांत माने | Updated: August 23, 2023 18:32 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातील आपल्या गटाच्या संघटनात्मक बांधणीला सुरूवात केली असून कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धूरा जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्यावर सोपवली आहे.

कल्याण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातील आपल्या गटाच्या संघटनात्मक बांधणीला सुरूवात केली असून कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धूरा जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्यावर सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावतीने नुकतेच शिंदे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले असून लवकरच शिंदे यांच्यावतीने कल्याण डोंबिवली जिल्हा नवीन कार्यकारीणी घोषित केली जाणार आहे.

माजी आमदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे जूने कार्यकर्ते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आप्पा शिंदे हे अजित पवार गटात आहेत. राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या आधी देखील शिंदे यांच्याकडे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यावेळी पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम शिंदेंनी हाती घेतले होते. तसेच कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय सुरू केले. शहरातील बीएसयुपीची घर, उल्हास नदी प्रदूषणाचा विषय, रस्ते विकास या विषयी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शिंदे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात कल्याण डोंबिवलीमधील राष्ट्रवादीला उभारी आली असताना प्रकृती ठिक नसल्याचे कारण देत त्यांनी २० फेब्रुवारीला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. अनेकजण जिल्हाध्यक्ष पदासाठी शर्यतीत होते परंतू शिंदे यांचा राजीनामा वरीष्ठ पातळीवर मंजूर करण्यात आला नाही. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर शिंदे हे अजित पवार गटात सहभागी झाले होते. त्यांच्यावर आता पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली गेली आहे. शिंदेच्या नियुक्तीने अजित पवार गटाला अच्छे दिनविधानपरिषदेचे आमदार राहीलेल्या शिंदे यांचे सामाजिक काम मोठे आहे. ते महाराष्ट्र केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. याआधी देखील त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. आता पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी अजित पवार गटाकडून नियुक्ती झाल्याने या गटाला अच्छे दिन आल्याची चर्चा कल्याण डोंबिवलीत आहे.

 ३१ ऑगस्टला विशेष बैठकआप्पा शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर ३१ ऑगस्टला कल्याण डोंबिवली स्तरावर विशेष बैठक कल्याणमध्ये पार पडणार आहे. त्यावेळी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याच पुढाकाराने नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस