शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

गर्दी टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी लढवली युक्ती; फित न कापताच वडवली पूलाचे केले लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 21:08 IST

Eknath Shinde : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, वडवली पूलाची लोकांची मागणी होती. काही कारणास्तव त्यात विलंब झाला. पूल खुला झाल्याने याठिकाणचे रेल्वे फाटक बंद होणार आहे.

कल्याण : आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान उभारण्यात आलेल्या वडवली रेल्वे उड्डाण पूलाच्या लोकार्पण कार्याक्रमात गर्दी टाळण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी युक्ती केली. पूलाचे लोकार्पण फित न कापता त्यावरुन गाड्यांचा ताफा नेऊन लोकार्पण केले. (Eknath Shinde's trick to avoid crowds; Inaugaration of Vadavalli bridge without cutting the ribbon)

या लोकार्पण सोहळ्य़ास शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपा खासदार कपील पाटील आणि शिवेसना आमदार विश्वनाथ भोईर, भाजपा आमदार रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी होते. पूलाच्या लोकार्पणास भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. परिस्थितीचे भान ठेवत पालकमंत्र्यांनी पूलाची फित न कापताच त्यावरुन गाडय़ांचा ताफा नेत यू-टर्न मारुन ते पुन्हा कल्याण मुरबाड रोडवरील वालधूनी पूलाचे लोकार्पण करण्यास पोहचले. त्याठिकाणीही त्यांनी फित कापली नाही. केवळ कोनशिलेचे अनावरण करुन पूलाचे लोकापर्ण झाल्याचे जाहीर केले. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, वडवली पूलाची लोकांची मागणी होती. काही कारणास्तव त्यात विलंब झाला. पूल खुला झाल्याने याठिकाणचे रेल्वे फाटक बंद होणार आहे. फाटक बंद झाल्याने रेल्वे गाडय़ांना फाटकामुळे होणारा विलंब टळणार आहे.वडवली रेल्वे उड्डाणपूलाच्या लोकार्पणानिमित्त पूलाच्या कडेला शिवसेना भाजपाने  झेंडे लावले होते. एकापाठोपाठ लावण्यात आलेले झेंडे पाहता. दोन्ही पक्षात श्रेयवादासाठी असलेली चढाओढ दिसून आली.

भाजपा आमदार चव्हाण  यांनी सांगितले की, वडवली पूलाच्या काम सुरु झाले. तेव्हा शिवसेना भाजपा युती होती. त्यामुळे वडवली पूलाच्या कामात भाजपानेही पाठपुरावा केलेला आहे. शिवसेना भाजपा यांच्या आजच्या घडीला विस्तव जात नसल्या तरी वडवली पूलाच्या निमित्ताने दोन्ही पक्षाचे खासदार आमदार एकत्रित आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

अधिक भाष्य करणो योग्य नाही..सचिन वाझे प्रकरणी पालकमंत्री शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने त्यावर अधिकचे भाष्य करणे योग्य नाही, असे सांगितले.

व्यापाऱ्यांच्या आंदोलनाची घेतली दखलकल्याण डोंबिवली महापालिकेने घातलेल्या निर्बंधाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आज डोंबिवलीत रास्ता रोको आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची पालकमंत्र्यांनी दखल घेतली. कल्याण मुरबाड रस्त्यावरील नव्या पूलावरच भाजपा खासदार  पाटील, भाजपा आमदार चव्हाण आणि आयुक्तांसोबत उद्या रविवारसाठी शिथिलता देण्यात आली आहे. उद्या होळी निमित्त दुकाने खुली राहणार आहेत. मात्र व्यापारी रविवारचा बंद नियम सोमवारी पाळणार आहे, असा चर्चेअंती तोडगा काढण्यात आला आहे. त्याला व्यापाऱ्यांनीच मान्यता दिली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीEknath Shindeएकनाथ शिंदे