शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

Eknath Shinde: 'हॅलो...मी एकनाथ शिंदे बोलतोय'; डोंबिवलीत फोन खणाणला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 10:43 IST

शिवसैनिकांच्या मनाची घालमेल सुरू असतानाच अचानक गुरुवारी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांचा फोन डोंबिवलीत खणाणला आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.

डोंबिवली

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडतांना दिसतायेत. सा सर्वाचं मुख्य कारण म्हणजे सेनेचे प्रमुख नेते तथा ठाणे जिल्ह्यात ज्यांचा दबदबा आहेत असे एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड पुकारलयं. त्यामुळे ठाणे ,कल्याण डोंबिवलीसह इतर जिल्ह्यातील इतर शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. एकीकडे शिंदे यांच्याविरोधात काही शिवसैनिक आक्रमक झालेले असताना दुसरीकडे मात्र ठाणे जिल्हा मात्र शांत होता. शिवसैनिकांच्या मनाची घालमेल सुरू असतानाच अचानक गुरुवारी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांचा फोन डोंबिवलीत खणाणला आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. याला कारणही तसं भावनिक आहे. 

राज्यातील घडामोडींचे LIVE UPDATES येथे क्लिक करा...       ''हॅलो  डॉक्टर..मी एकनाथ शिंदे बोलतोय.. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे.त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा... माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विंनती...'', हे संभाषण होतं एकनाथ शिंदे यांचं! शिंदे यांनी डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात फोन लावला होता. कारण ज्येष्ठ शिवसैनिक तथा डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची २१ जूनला अचानक तब्येत बिघडल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली. मग क्षणाचाही विलंब न करता गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजता थेट रुग्णालयातील डॉक्टरांना फोन लावला. 

"आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या", असं शिंदे म्हणाले. एकीकडे मोठया प्रमाणावर राजकीय उलथापालथ सुरू असतानाचा  शिंदे यांनी फोन करून कार्यकर्त्याच्या तब्येतीची चौकशी केल्याने शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येतं होतं.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाkalyanकल्याण