शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-शीळ रस्त्यावर मेट्रोच्या रात्रभर कामामुळे रहिवाशांची झोपमोड, झोपेचे झाले खोबरे

By अनिकेत घमंडी | Updated: June 5, 2024 12:06 IST

ध्वनी प्रदूषणाचा होतोय त्रास

अनिकेत घमंडी, डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावरील तळोजा - कल्याण मेट्रोच्या रात्रभर चाललेल्या कामामुळे आणि त्यांनी रस्त्यात मधोमध खांब टाकण्यासाठी खोदाई साठी आणलेली अवाढव्य मशीनचा मोठ्या कर्कश आवाजाने सदर रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या निवासी वस्तीला येणाऱ्या आवाजाने रहिवाशी त्रस्त झाले असून सदर काम रात्रभर करू नये अशी मागणी एमआयडीसीमधील नागरिकांकडून होत आहे.

कल्याण शीळ रस्त्यावर विको नाका ते सोनारपाडा/डोंबिवली नागरी सहकारी बँक पर्यंत मेट्रोचे काम सद्या जोरात चालू आहे. नुकतेच या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले होते. परंतु आता मेट्रो कामामुळे या रस्त्यावरील दुभाजक आणि त्यामध्ये लावलेली झाडे, पथदिवे हे काढून टाकण्यात आली आहेत. जर मेट्रोचे काम नियोजित होते तर हा रस्त्यावरील खर्च करायला नको पाहिजे होता. त्यामुळे करोडो रुपयांचा चुराडा झालाच आहेच शिवाय दुभाजकामध्ये लावलेली पूर्ण वाढ झालेली झाडे तोडण्यात येऊन फेकून देण्यात आली आहेत. नवीन लावण्यात आलेले दुभाजक रस्त्यांच्या बाजूला फेकण्यात आले आहेत. शिवाय या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी येथे होत असल्याचे रहिवासी राजू नलावडे म्हणाले.       कल्याण तळोजा मेट्रो ही डोंबिवली शहराबाहेरून जात असल्याने तिचा डोंबिवलीकरांना काहीही फायदा होणार नाही आहे. रेल्वेला पर्याय म्हणून डोंबिवलीकरांसाठी ठाणे, नवी मुंबई येथे जाण्यासाठी मेट्रो होणे आवश्यक होते. आता तर या कल्याण शीळ रस्त्यावर या कामामुळे कमीत कमी दोन वर्ष वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागणार असल्याने डोंबिवलीकरांच्या त्रासात आणखी भर पडणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.     मेट्रोचे काम करणारे एमएमआरडीए आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आवाहन करण्यात येते की, मेट्रोचे रात्रभर होणारे कर्कश आवाजाचे हे काम बंद करावे. शिवाय यातील तोडलेली झाडे ही पुन्हा योग्य जागी पूनरोपण Transplant करून लावावीत. अर्थात ही फेकलेली झाडे आता जिवंत राहिली आहेत का प्रश्न आहे ? कर्कश आवाज आणि झाडे तोडीमुळे होणारे प्रदुषण रोखावे त्यात आज जागतिक पर्यावरण दीन असल्याने याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी रहिवाशांनी केली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMetroमेट्रो