शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

डोंबवलकरांचा नागरी अभिवादन सोहळा; ४७ संस्थांच्या एकत्रित सहभागातून‌ कौतुकाची थाप

By अनिकेत घमंडी | Updated: February 20, 2023 14:53 IST

कुष्ठरोगी वसाहतीत काम करणाऱ्या गजानन माने यांचा पद्मश्री सन्मान मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला

डोंबिवली : नागरी अभिवादन न्यास ह्या डोंबिवलीतील ४७ संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिखर संस्थेतर्फे नागरी अभिवादन सोहळा २०२३ टिळकनगर शाळेच्या भव्य पटांगणात शेकडो प्रेक्षकांच्या साक्षीने रविवारी संपन्न झाला. ज्येष्ठ नागरी सन्मान डॉ. अंजली आपटे ( दिव्यांग सेवा ), श्रीकांत पावगी ( शैक्षणिक आणि पत्रकारिता), सुरेश फाटक ( वनवासी सेवा ) व सुभाष मुंदडा ( ग्रंथालय संचालन )ह्यांना प्रदान करण्यात आला. तर युवाचैतन्य सन्मान राही पाखले ( क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी), अमोल पोतदार‌ ( शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात योगदान ), रुपाली शाईवाले (पर्यावरण दक्षता मंचामार्फत अमूल्य योगदान ) आदींना प्रदान करण्यात आला. विवेकानंद सेवा मंडळाला संस्था पुरस्कार (त्यांच्या विहिगाव परिसरातील भरीव कार्यासाठी व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्यासाठी) देण्यात आला. 

कुष्ठरोगी वसाहतीत काम करणाऱ्या गजानन माने यांचा पद्मश्री सन्मान मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. डोंबिवलीकर एक परिवाराच्या प्रभू कापसे यांनी तयार केलेली सन्मान चिन्हे देवून सर्वांना गौरविण्यात आले. कौस्तुभ कुलकर्णी यांनी सुरेख ध्वनी चित्रफीतीद्वारे सर्व सत्कार मूर्तींचा जीवनपट उलगडला. कार्यक्रम अध्यक्षपद अलका मुतालिक ह्यांनी भूषविले.काही काळ डोंबिवलीत वास्तव्य केलेले व यावर्षी पद्मश्री पुरस्कार मिळालेले रमेश पतंगे हे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर न्यासाचे पदाधिकारी सुधीर जोगळेकर, माधव जोशी, प्रवीण दुधे, जयंत फलके उपस्थित होते. प्रारंभी शिवप्रतिमेची ओंकार शाळेच्या लेझिम पथकासह पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. अत्यंत दिमाखदार आणि सुनियोजित कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा रिद्धी करकरे हिने समर्थपणे पेलली. समारंभास गेल्या सात वर्षांतील अनेक सन्मानमूर्ती उपस्थित होते. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली