शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली ते लडाख: एक बंधन, रक्षाबंधन' संकल्पनेतून युवकाची लाखो जवानांसाठी राखी भेट

By अनिकेत घमंडी | Updated: July 17, 2024 20:50 IST

प्रत्येक राज्यात राख्या संकलन करण्याचा 'वे टू कॉज फाऊंडेशन'चा संकल्प सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

अनिकेत घमंडी, डोंबिवली: भारतीय सैन्यदलातील आपले शूरवीर जवान भारतमातेचे अहोरात्र संरक्षण करतात. त्या बांधवांप्रति आपल्या सर्वांच्याच मनात एक आपुलकीचे बंधन जपण्यासाठी डोंबिवलीतील रोहित आचरेकर याने वे टू कॉज फाऊंडेशन आणि वे टू कॉज रायडर्स क्लबच्या माध्यमातून एक बंधन, रक्षाबंधन या संकल्पनेतून लाखो सैनिकांना राख्या पोहोचवण्याचा संकल्प सोडला. त्यासाठी तो डोंबिवली ते लडाख मोटार सायकलने निघाला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी त्याच्या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवला.

कारगिल युद्धातील भारताच्या विजयाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वे टू कॉज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहितच्या नेतृत्वात १७ जुलै ते १९ ऑगस्ट दरम्यान डोंबिवली ते लडाख प्रांतातील कारगिल वॉर मेमोरियल अशी बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. यंदा हा उपक्रम डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून होत असल्याचे त्याने जाहीर।केले. गेल्या १८ वर्षांपासून ' यांनी उपक्रम राबवत आहे. डोंबिवली पश्चिम येथील स्टेशन रोड परिसरात ७७ स्क्वेअर फूट ध्वज फडकवून उपक्रमाचा शुभारंभ केला.

त्या उपक्रमाअंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही भारताचा स्वातंत्र्यदिन आणि त्यानंतर येणारे रक्षाबंधन सैनिकांसोबत साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अखंड भारतातील प्रत्येक राज्यात ७७ स्क्वेअर फूट ध्वज फडकवण्याचा वे टू कॉज फाऊंडेशनचा संकल्प आहे.तर स्वातंत्र्यदिनी लडाख येथे ७७ फूटचा ध्वज फडकवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक राज्यातून सैनिकांसाठी राख्या गोळा करण्यात येणार आहेत. यासाठीचे संपूर्ण नियोजन रोहित यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. देशभक्ती आणि आपुलकी जागवणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून हा उपक्रम वर्षानुवर्षे असाच सुरू रहावा, असे म्हणत या उपक्रमाला डोंबिवलीकरांनी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनladakhलडाख