शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

Dombivali Rain: कल्याण डोंबिवलीला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

By अनिकेत घमंडी | Updated: September 16, 2022 12:44 IST

Dombivali Rain: मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहर परिसराला झोडपून काढले असून गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर प्रचंड वाढलेला आहे. शुक्रवारी सकाळी जोरदार सरी बरसल्या असून दुपारी १२ वाजता जोर आणखी वाढला होता, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

- अनिकेत घमंडी डोंबिवली - मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहर परिसराला झोडपून काढले असून गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर प्रचंड वाढलेला आहे. शुक्रवारी सकाळी जोरदार सरी बरसल्या असून दुपारी १२ वाजता जोर आणखी वाढला होता, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

दोन्ही सत्रातील शालेय विद्यार्थ्यांना जाता येताना पावसामुळे अडथळे आले, स्कुल बसचा वेग मंदावला होता, शहरांतील मानपाडा, टिळकपथ, एमआयडीसी पश्चिमेला म.फुले रोड, सुभाष रोड, दीनदयाळ रोड यांसह कोपर आणि कुंभरखन पाडा आदी भागात वाहतूक मंदावली होती. सुभाष रस्त्यावर खड्डे असल्याने रिक्षा वाहतूक आणि दुचाकींची अडचण झाली होती, नागरिकांना त्याचा।खूप त्रास झाला. ठीकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे डबके झाल्याने वाहनांना खड्याचा अंदाज आला नाही, त्यामुळेही आबालवृद्धांना मार्ग काढताना त्रास झाला. बाजारपेठमध्येही शुकशुकाट  पसरला होता, व्यावसायिक सततच्या पावसामुळे ग्राहक नसल्याने चिंतेत होते.

कल्याण मध्येही पूर्वेला चक्कीनाका, तासगाव यांसह तिसाई परिसर आदी भागात पावसाचे पाणी साचले असल्याने तेथे वाट काढताना पादचारी, वाहनचालक आदींना अडथळे आले. शिवाजी चौकात नेहमी प्रमाणे वाहतूक कोंडी झाली होती, मार्केट परिसरात वर्दळ होती, परंतु पावसामुळे धंद्याला तेजी नसल्याचे सांगण्यात आले.

स्टेशन परिसरात रिक्षा पकडण्यासाठी नागरिकांची  धावपळ झाली, अपेक्षित ठिकाणी रिक्षा यायला तयार नसल्याने प्रवाशांची पंचाईत झाली होती.दिसवभर आकाश ढगाळलेले होते.

गेल्या आठवाड्यात वीजा चमकल्या तशा या दोन दिवसात न चमकल्याने नागरिकांना दिलासा।मिळाला, परंतु पावसाचा जोर वाढल्याने खाडी परिसरातील रहिवाशांमध्ये पावसाचे पाणी घरात।शिरते की काय याची चिंता होती, दुपारी 12 पर्यन्तच्या माहितीनुसार खाडी किनारा सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीRainपाऊस