शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Dombivali: नेतीवली टेकडी, वृक्ष संवर्धनासाठी संरक्षक भिंत आवश्यक, अभ्यासकांनी मांडल्या सूचना

By अनिकेत घमंडी | Updated: May 7, 2024 13:21 IST

Dombivali News: डोंबिवली शहर परिसरातील एकूणच पर्यावरणीय परिस्थितीचा धांडोळा घेण्याच्या उद्देशाने नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास तसेच डोंबिवली शहरातील असंख्य निसर्ग प्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन निसर्ग शिक्षणाचे प्राथमिक धडे इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर अँड रिसर्च या संस्थेद्वारा देण्यात आले.

- अनिकेत घमंडी डोंबिवली - शहर परिसरातील एकूणच पर्यावरणीय परिस्थितीचा धांडोळा घेण्याच्या उद्देशाने नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास तसेच डोंबिवली शहरातील असंख्य निसर्ग प्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन निसर्ग शिक्षणाचे प्राथमिक धडे इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर अँड रिसर्च या संस्थेद्वारा देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने नेतीवली टेकडीला संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असून टेकडी संवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे कोणकोणती लावावीत याचा एकत्रित विचार करण्यात आला. याच निमित्ताने औद्योगिकीकारणांमुळे वाढलेले प्रदूषण, डोंबिवली परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने काय आणि कसे प्रयत्न करता येतील याबाबत चर्चा होऊन, सिटी फॉरेस्ट संकल्पने अंतर्गत तयार होणाऱ्या मानवनिर्मित वनासाठी स्वतःचे योगदान कशा प्रकारे देता येईल याबाबत काही मान्यवरांनी त्यांचे विचार व्यक्त केले. सिटी फॉरेस्ट या संकल्पने वर आधारित माहिती शिक्षण व प्रशिक्षण घेण्यात आले.

डोंबिवली शहरातील मिलापनगर परिसरातील आकारास येत असलेल्या शैलगंगा सिटी फॉरेस्ट प्रकल्पाच्या आयोजनाच्या निमित्ताने, शहरीवन म्हणजेच सिटी फॉरेस्ट ही संकल्पना काय असते, डोंबिवली शहरांसाठी सिटी फॉरेस्ट प्रकल्पाचे महत्व आणि त्याची अनिवार्यता, डोंबिवली शहरात आकारास येणाऱ्या सिटी फॉरेस्ट प्रकल्पाचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन आणि अंमलबजावणी, अशा सर्व मुद्द्यांवर संपूर्ण माहिती देऊन त्यावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. या चर्चासत्राच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नागरिकांनी सिटी फॉरेस्ट या संकल्पना समजून घेताना सोबतच येत्या पावसाळ्यात सिटी फॉरेस्ट संकल्पने अंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या या मानवनिर्मित वनामध्ये अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येणार आहेत, ज्याची सविस्तर माहिती आयईएआर संस्थेच्या वतीने पर्यावरण तज्ञ व प्रकल्प समन्वयक अविनाश कुबल यांनी उपस्थितांना करून दिली. त्या चर्चासत्राला नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यासचे अध्यक्ष डॉ. सुनील पुणतांबेकर, विश्वस्त विवेक लिमये, आयइएआर संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव तायशेटे, सचिव डॉ. साधना महाशब्दे, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे दीपक काळे, पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली केंद्राच्या प्रमुख रूपाली शाइवाले, न्यास ट्रस्टचे प्रमुख विश्वास भावे, डोंबिवलीतील प्रथितयश आयुर्वेदतज्ञ वैद्य नरहर प्रभू यांसह मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीNatureनिसर्गenvironmentपर्यावरण