शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
Kamchatka Earthquake : ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
3
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
4
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
5
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
6
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
7
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
8
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
9
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
11
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
12
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
13
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
14
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
15
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
16
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
17
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
18
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
19
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
20
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!

पुन्हा डोंबिवली..! एमआयडीसीत अग्नितांडव, नागरिकांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 08:02 IST

Dombivali MIDC Blast: डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान (अंबर) या रासायनिक कंपनीत रिॲक्टरच्या भीषण स्फोटाच्या घटनेला जेमतेम २० दिवस होत नाहीत तोच बुधवारी सकाळी डोंबिवलीतील एमआयडीसी पुन्हा एकदा अग्नितांडव आणि स्फोटाच्या आवाजाने हादरली. इंडो अमाइन या कंपनीच्या रसायन साठ्याने पावणेअकराच्या सुमारास पेट घेतला.

 डोंबिवली -  येथील एमआयडीसीतील अमुदान (अंबर) या रासायनिक कंपनीत रिॲक्टरच्या भीषण स्फोटाच्या घटनेला जेमतेम २० दिवस होत नाहीत तोच बुधवारी सकाळी डोंबिवलीतीलएमआयडीसी पुन्हा एकदा अग्नितांडव आणि स्फोटाच्या आवाजाने हादरली. इंडो अमाइन या कंपनीच्या रसायन साठ्याने पावणेअकराच्या सुमारास पेट घेतला. आगीची झळ शेजारील अभियांत्रिकी कंपनीलाही बसली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एकापाठोपाठ एक होणाऱ्या आग आणि स्फोटांच्या घटनांमुळे डोंबिवलीकरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 

इंडो अमाइन या कंपनीत रसायनांचा साठा करून ठेवला होता. त्याला बुधवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे कंपनीत आगीचा भडका उडून स्फोटांचे आवाज होऊ लागले. परिसरातील नागरिकांच्या अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या अमुदान कंपनीतील स्फोटांच्या कटु आठवणी जागृत झाल्या. सर्वत्र घबराट निर्माण झाली. अनेकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. 

स्फोटानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठविले आगीच्या ज्वाळांनी शेजारील माल्दा इंजिनीअरिंग या कंपनीलाही कवेत घेतले. आजूबाजूच्या कंपन्यांतील कामगारांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दुर्घटनाग्रस्त कंपनीच्या नजीकच अभिनव विद्यालय आहे. स्फोटानंतर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले. इंडो अमाइन कंपनीत कोणीही कामगार नसल्याने जीवितहानी टळली. आगीचे आणि धुराचे लोट आसमंतात दूरवरून दिसत होते. जळालेल्या रसायनाचा उग्र दर्पही परिसरात दीर्घकाळपर्यंत भरून राहिला होता. मंत्री रवींद्र चव्हाण, महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, उद्धवसेनेच्या वैशाली दरेकर, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.  

लागले चार तासआगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर दुपारी ३ वाजता आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. रात्री उशिरापर्यंत कूलिंगचे काम सुरू होते. 

स्कूल व्हॅन जळून खाककंपनीला लागलेल्या आगीत या परिसरात असलेल्या अभिनव शाळेच्या तीन ते चार स्कूल व्हॅन जळून खाक झाल्या. एमआयडीसी परिसरातील झाडेही जळून गेली. रस्ते, नाल्यांत रसायन कंपनीतील रसायनांनी भरलेले ड्रम बाहेर काढले. मात्र, यातील रसायन रस्त्यावर सांडले होते, तसेच नाल्यातून हे रसायन वाहत असल्याने नाल्यातील पाण्याला विविध रंग आले होते. 

परिसरात घबराटअमुदान कंपनीतील आगीच्या आणि स्फोटाच्या आठवणी ताज्या असल्याने कंपनीच्या परिसरात घबराटीचे वातावरण होते. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना रसायनांच्या उग्र दर्पामुळे त्रास जाणवत होता. अनेक ठिकाणी वीज प्रवाहही खंडित झाला होता.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसीBlastस्फोट