शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचे उपसंचालक पेंढरकर कॉलेजला देणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 07:50 IST

Pendharkar College News: पेंढरकर महाविद्यालयात अनुदानित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन खोल्यांमध्ये सकाळी ९ ते सायं ४ वाजेपर्यंत काम न देता बसवून ठेवले. या प्रकरणी प्राध्यापकांनी आवाज उठवला.

डोंबिवली - पेंढरकर महाविद्यालयात अनुदानित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन खोल्यांमध्ये सकाळी ९ ते सायं ४ वाजेपर्यंत काम न देता बसवून ठेवले. या प्रकरणी प्राध्यापकांनी आवाज उठवला. शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाने दखल घेतली. अधिकारी महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. प्राध्यापकांच्या या ‘छळछावणी’चे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी प्रसिद्ध केले होते. 

मुंबई ज्युनिअर्स  कॉलेज टीचर्स असोसिएशन अध्यक्ष एस. एल. दीक्षित यांनी अन्याय झालेल्या प्राध्यापकांच्या शिष्टमंडळास घेऊन शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप सांगवे यांची भेट घेतली. यावेळी सांगवे यांना मंत्रालयात बैठक असल्याने त्यांनी त्यांच्या सचिवांना शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचे सूचित केले.  

अनुदानितच्या प्राध्यापकांना काम दिले जात नाहीमहाविद्यालय अनुदानित आहे. ते विनाअनुदानित करण्याचा ज्युनिअर महाविद्यालयाचा प्रस्ताव नाकारला आहे. तर, डिग्री कॉलेजचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. १८ प्राध्यापकांना यापूर्वी कामावरून काढून टाकले होते. त्यापैकी पुन्हा सहा जणांना फोन करून बोलावले. त्यानंतर पुन्हा सहा जणांना कामावरून काढून टाकले आहे, असे प्राध्यापकांनी चर्चेवेळी सचिवांना सांगितले. विनाअनुदानित प्राध्यापकांना अनुदानितावर घेण्याचा सरकारने जीआर काढला आहे. त्याची अंमलबजावणी केली जात नाही. अनुदानित प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस खोलीत बसवून ठेवले जात आहे. महाविद्यालय १५ जून रोजी सुरू होणार आहे. त्याआधी ३ जूनला महाविद्यालय सुरू केले आहे. विनाअनुदानित प्राध्यापकांकडून काम करून घेतले जात आहे. अनुदानितच्या प्राध्यापकांना काम दिले जात नाही, असेही सांगितले. 

आमचे कॉलेज अनुदानित होते. १५ टक्के शिक्षक होते. बाकी शिक्षकांची सरकार भरती करीत नव्हते. आमचे कॉलेज स्वायत्त आहे. संस्थेने कॉलेज विनाअनुदानित करण्याचा प्रस्ताव पाठविला. तो प्रस्ताव सरकारने मंजूर केला नाही. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे कारण देत सरकारने हा प्रस्ताव नामंजूर केल्याने उच्च न्यायालयात आम्ही प्रकरण दाखल केले.- प्रभाकर देसाई, अध्यक्ष, डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ 

लेखा परीक्षणाअंती पैसे परत मिळणारअनुदानित तुकड्या असताना विनाअनुदानित तुकड्यांचा प्रवेश सुरू केला आहे. त्यांच्याकडून जास्तीची शैक्षणिक फी वसूल केली जात आहे, हे मुद्दे सचिवांपुढे मांडले. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारे प्रवेश कधीपासून सुरू आहेत, अशी विचारणा केली. त्यावर हा प्रकार १० वर्षांपासून सुरू आहे, असे सांगण्यात आले. त्यावेळी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणीत लेक्चर्स सुरू असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांकडून फी वसूल केल्यास त्याचे लेखा परीक्षण केले जाईल. लेखा परीक्षणाअंती पैसे परत केले जातील, असे आश्वासन सचिवांनी दिल्याची माहिती पीडित प्रा. संदीप चंदनशिवे यांनी दिली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय