शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आधी घेतली शपथ नंतर केले उल्लंघन! पुष्पगुच्छाला प्लास्टीक लावल्याने उपायुक्तांना ५ हजार रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 17:50 IST

अनेकदा कल्याण डोंबिवली महापलिका विविध जनजागृती करण्यासाठी नागरीकांना आवाहन करीत असते. काही प्रसंगी महापालिकेकडून त्याचे पालन केले जात नाही.

कल्याण-

अनेकदा कल्याण डोंबिवली महापलिका विविध जनजागृती करण्यासाठी नागरीकांना आवाहन करीत असते. काही प्रसंगी महापालिकेकडून त्याचे पालन केले जात नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असे असते. मात्र आज महापालिकच्या कार्यक्रमात प्लास्टीक न वापरण्याची शपथ घेतली गेली. त्याच कार्यक्रमात पुष्पगुच्छाला प्लास्टीकचे आवरण  वापरल्याने घनकचरा विभागाच्या उपायुक्तांनी चक्क महिला उपायुक्तास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चांगल्या कामाची सुरुवात घरापासून केल्याचे मत घनकचरा उपायुक्तांनी व्यक्त केले आहे. 

महापालिका मुख्यालयात सुरक्षा रक्षकांनी रक्तदान शिबीराचे आयोजन आज करण्यात आले होते. या कार्यक्रमास खुद्द आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थीत होते. यावेळी रक्तदान शिबीराचा शुभारंभ झाला. मात्र महापालिका 2 ते 9 जानेवारी दरम्यान महापालिकेकडून प्लास्टीक विरोधी मोहिम राबविली जात आहे. त्यापूर्वी महापलिकेने कल्याण डोंबिवलीतील दुकानदारांकडून प्लास्टीक पिशव्या जप्त करण्याची कारवाई केली होती. आज रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्लास्टीक न वापरण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. याच कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ देण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त पल्लवी भागवत या उपस्थित होते. त्याचबरोबर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे हे देखील उपस्थित होते. त्यांच्या नजरेत ही बाब आली की, पुष्पगुच्छ दिला जात आहे. त्याला प्लास्टीकचे आवरण आहे. त्यांनी या प्रकरणी उपायुक्त भागवत यांनी प्लास्टीक वापर केल्याने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

प्लास्टीकचा वापर न करण्याची सवय महापालिकेच्या सर्व कामगार अधिकारी वर्गास लागली पाहिजे. चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून स्वत:च्या घरापासून केली पाहिजे असे कोकरे यांनी कारवाई पश्चात  सांगितले. या संदर्भात उपायुक्त भागवत यांच्याकडून काही एक प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. तर सुरक्षा रक्षकांनी कार्यक्रम जरी त्यांचा असला तरी उपायुक्तांच्या विरोधात कारवाई झाल्याचे स्पष्ट केले आहे. तर काहींच्या मते ही कारवाई सुरक्षा रक्षकांच्या विरोधात केली असल्याचे सांगण्यात आले. मात्र उपायुक्त कोकरे यांनी उपायुक्तांच्या विरोधात कारवाई केल्याचे मान्य करीत अन्य चर्चाना पूर्णविराम दिला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण