शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

झेंडू हसला ...अन  व्यापाऱ्यांना 'बाप्पा पावला' ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 16:53 IST

गणेशोत्सवामुळे फुलांची मागणी वाढली 

ठळक मुद्देगणेशोत्सवामुळे फुलांची मागणी वाढली 

मयुरी चव्हाण कल्याणच्या कृषी  उत्पन्न बाजारातील फुल मार्केटमधील  ही फुलं आज आनंदाने बहरून आलीये. कारण कोरोना संकटामुळे  फुल बाजाराला तुरळकच ग्राहक यायचे. ग्राहकांच्या प्रतीक्षेत ही फुलं असायची. अखेर कंटाळून निराशेन ही फुलंही कोमेजून जायची आणि फुलं व्यापारीही फुलांकडे पाहून हताश व्हायचे! मात्र  गुरुवारी अवघ्या फुल बाजारातील ताजी टवटवीत फुलं खळखळून हसत जणू काही ग्राहकांच स्वागत करत असल्याचं चित्र होत. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी  सकाळपासून  विविध प्रकारची फुल खरेदी  करण्याला प्राधान्य दिलं. इतर दिवसांपेक्षा बाजर भावही चांगला मिळाल्यानं  बाप्पा पावला अशा भावना फुल विक्रेत्यांनी व्यक्त केल्या. सर्व फुलांमध्ये पिवळ्या झेंडूला जास्त मागणी असल्यानं  झेंडूच्या फुलांचा तोरा बाजारात काही औरच होता.

पावसामुळे  शेतकऱ्यांचे  नुकसान झालं , मंदिर बंद असल्याचा परिणामही  विक्रीवर झाला. मात्र एरवी पेक्षा गणेशोत्सवामुळे  आता फुलांच्या  भावामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्यानं शेतकरी आणि व्यापारी या  दोघांनाही काहीसा दिलासा मिळालाय. कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या  संकटात सापडलेल्या फुल बाजाराला गणेशोत्सवामुळे खऱ्या अर्थानं तेजी मिळाली आहे. गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात सुमारे १५० टन फुलांच्या विक्रीचा अंदाज  व्यक्त करण्यात आलाय. कवडीमोल किंमतीला फुलं विकावी लागत असल्यानं अनेकदा  बळीराजाने  व्यथित होऊन फुलं  रस्त्यावर फेकली.  व्यापाऱ्यांवर ही तीच वेळ आली. मात्र आता मार्केट मधये काहीसं सकारात्मक चित्र असून एरवी ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या फुलांना "फुल टू डिमांड" आल्यानं  फुल आणि फुलांचे व्यापारी दोघही खुश आहेत.फुल                      भाव  ( प्रति किलो). पिवळा झेंडू             ५० -६० 

लाल झेंडू                  ६० 

पांढरी शेवंती             ६० 

पिवळी शेवंती            ८०-१००

तुका                         १००

कापरा                      ५० 

गुलछडी                    ३०० -४००

कोरोनामुळे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. ग्राहक मार्केट मध्ये फारसे फिरकत नसल्यानं हताश होऊन  फुलं अक्षरशः फेकून देण्याची नामुष्की अनेकदा आली. गणेशोत्सवामुळे आज फुलांची मागणी वाढली असून व्यापा-यांना बाप्पा पावला आहे. भाऊ नरवडे, फुलांचे व्यापारी  

पवसामुळे शेतकऱ्यांच नुकसान झालं. मंदिर बंद असल्यानं थोडा फटका विक्रीला बसत आहे. मात्र मागील काही काळ पाहता आज  ग्राहकांची  गर्दी झाली असून पिवळ्या झेंडूला जास्त मागणी आहे.  खूप दिवसांनी बाजारभावही  चांगला मिळत असल्यानं व्यापा-यांना बाप्पा पावला आहे. बाळासाहेब गायकवाड, फुलांचे व्यापारी

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीGanesh Mahotsavगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सव