शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘डोंबिवली ते स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सायकलवरून प्रवास; चार दिवसांत ४२५ किलोमीटरचे अंतर पार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 07:01 IST

या राईडमध्ये शाळेचे ट्रस्टी, पुण्याचे मित्र यांचा सल्ला घेतला. तलासरी आणि भरूच इथे जैन टेम्पलमध्ये राहण्याची सोय झाली आणि एक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले.

अनिकेत घमंडीडोंबिवली : मुलुंड येथील एका शाळेत शिक्षकीपेशा सांभाळून सायकलिंगचा छंद जोपासणाऱ्या डोंबिवलीकर मीरा वैद्य यांनी ७ ते १० सप्टेंबर या चार दिवसांत डोंबिवली ते स्टॅच्यू ऑफ युनिटी हे ४२५ कि.मीचे अंतर सायकलने एकटीने पूर्ण केले. 

त्यांनी त्या प्रवासाची आखणी काही महिने आधी स्वतःच केली होती. त्यासाठी डोंबिवली-तलासरी-नवसारी- भरूच -स्टॅच्यू ऑफ युनिटी असा मार्ग निवडला होता. यापूर्वी पुणे-जम्मू सायकलिंग याच मार्गावरून केल्याने त्यांना रस्त्याची माहिती होती. जेव्हा एकटीने जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही जणांनी करू शकतेस असे म्हणत मनोधैर्य उंचावले, तर काही जणांनी नका करू, असेही सांगितले. पण, मनात तीव्र इच्छाशक्ती असल्याने एकटीनेच ही राईड पूर्ण करणार असे ठरविले, असे वैद्य म्हणाल्या.

या राईडमध्ये शाळेचे ट्रस्टी, पुण्याचे मित्र यांचा सल्ला घेतला. तलासरी आणि भरूच इथे जैन टेम्पलमध्ये राहण्याची सोय झाली आणि एक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले. त्या भागातही पावसामुळे रस्ते खूप खराब होते. त्यामुळे सायकलची खूप काळजी घ्यावी लागत होती. सतत काही अंतरावर पाऊस पडत असल्याने पूर्ण चार दिवस भिजत राईड पूर्ण करावी लागली, असे त्या म्हणाल्या.

आपण आपली काळजी घ्यावीजेव्हा पाच कि.मी.वरून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे दर्शन झाले, तेव्हा तर आनंद गगनात मावेनासा झाला. कोणी विचारले नाही तरी सांगावेसे वाटते की हो मी माझे स्वप्न पूर्ण केले. आता पूर्ण केलेल्या स्वप्नामुळे आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. एकटीने प्रवास करताना कोणताही वाईट अनुभव न आल्याने सर्व महिलांना सांगावेसे वाटते, सगळे जग वाईट नसते, फक्त आपण आपली काळजी घेत प्रवास सुरू ठेवायचा. राईड करताना बरेच स्थानिक हात उंचावून शुभेच्छा देत होते, तर कोणी एकटीने हे धाडस केले याचे कौतुक करीत होते, असे मीरा वैद्य  यांनी सांगितले.