शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर " ती " पाण्यात हुडहुडली ,अखेर ...... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 14:53 IST

कल्याणात  चेंबरमध्ये पडलेल्या तीन  कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव  केडीएमसीच्या फायर ब्रिगेडने वाचवला होता. आता पुन्हा एकदा   फायर ब्रिगेडच्या  जवानांनी माणुसकीचं दर्शन दाखवून आणखी एका मुक्या प्राण्याला जीवनदान दिलं आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याणात  चेंबरमध्ये पडलेल्या तीन  कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव  केडीएमसीच्या फायर ब्रिगेडने वाचवला होता. आता पुन्हा एकदा   फायर ब्रिगेडच्या  जवानांनी माणुसकीचं दर्शन दाखवून आणखी एका मुक्या प्राण्याला जीवनदान दिलं आहे. कल्याण मधील सह्याद्री नगर परिसरात एक गाय चेंबरमध्ये अडकली होती. याबाबतची माहिती रहिवाशांनी मंगळवारी संध्याकाळी फायर ब्रिगेडला  दिली आणि क्षणाचाही विलंब न करता फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर ड्रेनेजच्या पाण्यात राहिल्यामुळे गाय थंडीने हुडहुडत होती. त्यामुळे  जवानांनी गरम पाण्याने  गाईला आंघोळ घातली. हे सर्व दृश्य पाहून उपस्थिताचं देखील मन भरून आलं. 

      सोमवारपासून दशरथ तावरे यांच्या मालकीची  गाय हरवली होती. मात्र ही गाय चेंबरमध्ये पडल्याने तिचा  शोध लागत नव्हता. याबाबतची माहिती मिळताच  प्रयत्नांची शिकस्त करत आणि आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत  चेंबरमध्ये अडकलेल्या गाईला बाहेर काढण्यात जवानांना यश  आलं. रात्रभर चेंबर मध्ये असल्याने तिला बाहेर येण्यास त्रास होत होता, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.  चिखलात माखल्यामुळे तसेच रात्रभर पाण्यात राहून थंडीमुळे गाईला चांगलीच हुडहुडी भरलेली.तिला बरं वाटावं म्हणून  जवानांनी मोठ्या मायेनं गरम पाण्यांन आंघोळ  देखील घातली. हा सर्व प्रकार दशरथ  तावरे  यांना माहीत पडल्यावर त्यांनी देखील आनंद व्यक्त केला. 

अग्निशमन दलाच्या विनायक लोखंडे, प्रमोद कोलते,हेमंत असकर ,सुशिल कवटे, राठोड आदींच्या टीमने ही कामगिरी केली.