शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: केडीएमसी हद्दीत लसीकरण केंद्रे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, श्रीकांत शिंदे यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 05:58 IST

coronavirus in KDMC : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात खासदारांनी आयुक्तांसोबत बैठक घेतली. या वेळी भाजप आमदार रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीस शिवसेनेचे पदाधिकारी विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, विजय साळवी, मनोज चौधरी आदी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या विषयावर आयुक्तांसोबत शिंदे यांनी चर्चा केली.  सध्या मनपा हद्दीत बेड किती उपलब्ध आहे, त्याचा आढावा घेण्यात आला. वाढती रुग्णसंख्या पाहता आणखी बेड लागू शकतात. त्याचबरोबर आर्ट गॅलरी आणि पाटीदार भवनसारखे कोविड सेंटर उभारण्याची गरज भासू शकते. केंद्राकडून राज्याला कोरोना लसीचा साठा कमी मिळत आहे. ही बाब लोकसभा अधिवेशनात खासदारांनी उपस्थित केली होती. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होताच लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरणासाठी आणखी केंद्रे वाढविता येऊ शकतात. लसीचा पुरेसा साठा महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यास उपलब्ध झाल्यास लसीकरणाचा वेग वाढविता येणार आहे. या गोष्टी लक्षात घेता आयुक्तांनी मनपा हद्दीत कोरोना लसीकरणाची केंद्रे वाढवावीत. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाणही वाढवावे, याकडे लक्ष वेधले आहे. आरोग्य सुविधांवर  भर द्या : चव्हाणचव्हाण यांनी सांगितले की, कोराना लसीकरण केंद्रे वाढवावीत, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. त्यासाठी २०० जणांचा कर्मचारी वर्ग लागणार आहे. त्यासाठी तजवीज करून कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य सोयीसुविधा वाढवाव्यात, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस