शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

coronavirus: कल्याणच्या डी-मार्टमधील सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, पाच दिवसांकरिता डी-मार्ट सिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 17:30 IST

Coronavirus In KDMC : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत काल कोरोनाचे नव्याने ५९३ रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढतेय हे पाहून महापालिकेने टेस्टींगचे प्रमाण वाढविले आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत काल कोरोनाचे नव्याने ५९३ रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढतेय हे पाहून महापालिकेने टेस्टींगचे प्रमाण वाढविले आहे. या टेस्टींग मोहिमेत कल्याणच्या डी मार्ट मध्ये कोरानाचे सहा कर्मचारी कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आढळून आली आहे. त्यामुळे डी मार्ट पाच दिवसाकरीता सील करण्यात आले आहे. (Six employees of Kalyan's D-Mart corona positive, D-Mart sealed for five days)महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलाना फेरीवाले, दुकानदार यांच्या कोरोना टेस्ट करण्याचा सपाटा महापालिकेने लावला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाला होती. तेव्हा महापालिका हद्दीत १ हजार २०० जणांची दररोज कोरोना टेस्ट केली जात होती. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेने पुन्हा टेस्टींगचे प्रमाण वाढविले आहे. परवाच्या दिवशी २ हजार ८०० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. कालच्या तारखेत कोरोना टेस्टींगचे प्रमाण ३ हजार ५०० इतके होते. टेस्टींगचे प्रमाण वाढविल्याने काल डी मार्टमधील ११० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी सहा कर्मचारी कोरोना पॉझीटीव्ह आढळून आले. महापालिकेने डी मार्ट पाच दिवसाकरीता सील केले आहे. तसेच अन्य कर्मचा:याना क्वारंटाईन करण्यात आले आहे. डी मार्टमध्ये दररोज हजारो लोक खरेदीसाठी येतात. त्याठिकाणी सोशल डिस्टसींग आणि मास्कचे पालन केले जात नाही. त्यामुळे त्याठिकाणी सहा कर्मचारी पॉझीटीव्ह आढळून आले. प्रत्यक्षात या कर्मचा:यांचा अन्य किती जणांशी संपर्क आला आहे याचा नेमका आकडा महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही.कोरोना रुग्णांची संख्या राज्यात वाढत आहे. त्याला महापालिका अपवाद नाही. राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आणू नका असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या भितीपोटी नागरीकांकडून खरेदीसाठी डी मार्टमध्ये गर्दी केली जात आहे. महापालिकेने ११ मार्चपासून कड र्निबध लागू केले. त्यानंतर काल मिशन बिगेन्स अगेन्सची नोटिसही कालच जारी केली आहे. त्यात काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. दंडात्मक कारवाई, गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊनही कल्याण डोंबिवलीत काही  एक फरक पडत नसल्याची बाब डी मार्टच्या प्रकरणावरुन समोर आली आहे.

यापूर्वीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पोलिसांनी डी मार्टवर यापूर्वी कारवाई केली होती. तसेच डी मार्टला १० हजार रुपयांची दंड महापालिका प्रशासनाकडून ठोठावण्यात आला होता. त्यानंतरही डी मार्टमध्ये सुधारणा आढळून आली नाही. पाच दिवसानंतर कोरोना नियमावलीचे पूर्ण पालन करुन त्याला मार्ट खोलता येणार नाही आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkdmcकल्याण डोंबिवली महापालिका