शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

CoronaVirus News : सांगा, कोरोना रोखायचा तरी कसा?, केडीएमसीसमाेर गंभीर प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 13:34 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त हाेत असताना नगरिकांकडून नियमांना दिली जात असलेली तिलांजली कोरोनासंबंधी चिंता वाढवणारी आहे.

कल्याण - दिवाळीपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती, पण आता पुन्हा रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने आणि केडीएमसीने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास होत असलेले उल्लंघन याला कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे काेराेनाला राेखायचे तरी कसे, असा प्रश्न सध्या पालिका प्रशासनाला भेडसावत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त हाेत असताना नागरिकांकडून नियमांना दिली जात असलेली तिलांजली कोरोनासंबंधी चिंता वाढवणारी आहे.

केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अनलॉकमध्ये रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात सर्वाधिक म्हणजे १३ हजार ३९२ रुग्णांची नोंद झाली होती. १२ जुलैला एका दिवसात तब्बल ६६१ रुग्ण आढळले होते. गणेशोत्सव कालावधीत नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने सप्टेंबरमध्येही कोरोनाचा कहर कायम राहिला. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि वाढवलेल्या कोरोना चाचण्या यात केडीएमसीला कोरोनावर काही प्रमाणात का होईना, अंकुश आणण्यात यश आले. दिवाळीपूर्वी म्हणजे १० नोव्हेंबरला सर्वात कमी म्हणजे ५९ रुग्ण आढळून आले होते. पण, पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने दिवाळी खरेदीनिमित्त सर्वत्र झालेली गर्दी आणि नियमांचे नागरिकांकडून सर्रास होत असलेले उल्लंघन रुग्णवाढीला कारणीभूत ठरल्याची शंका व्यक्त होत आहे.

कारवाई अधिक तीव्र करण्याची मागणी

अनलॉकमध्ये सर्वत्र बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहऱ्यावर मास्क रूमाल, कापड परिधान करणे बंधनकारक आहे. पण, बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई महापालिका करत असली, तरी या कारवाईचे भय राहिलेले नाही. तरुणांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सर्रास दिसत असले तरी भाजीविक्रेते, फेरीवाले, दुकानदारही त्यांना घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. एकूणच हे चित्र पाहता केडीएमसीने कारवाई अधिक तीव्र करायला हवी, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणdombivaliडोंबिवली