शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : केडीएमसीच्या कोविड सेंटरमध्येही Remdesivir चा तुटवडा, इंजेक्शनसाठी नातेवाईकांची धावपळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 18:13 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : पालिकेच्या रुग्णालयात नियमित इंजेक्शन उपलब्ध करून दिली जात असतानाही या रुग्णालयातून प्रिस्क्रिप्शन देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. 

राज्यात सर्वत्रच रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कल्याण डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांमधून देखील रेमडेसिवीरचे प्रिस्क्रिप्शन नातेवाईकांना लिहून दिल जातं आहे. मात्र आता केडीएमसीच्या कोविड सेंटर मधून देखील रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात रेमडेसिवीर बाहेरून आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिले जात असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र पालिकेच्या रुग्णालयात नियमित इंजेक्शन उपलब्ध करून दिली जात असतानाही या रुग्णालयातून प्रिस्क्रिप्शन देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. 

राज्य शासनाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून थेट रुग्णालययाना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. मात्र प्रत्यक्षात मागणीच्या 30 टक्के देखील इंजेक्शन देखील उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुसरीकडे पालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाकडून हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात असल्याने पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना काहीसा दिलासा मिळत होता. मात्र आता पालिका रुग्णालयांना देखील इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागल्याचं चित्र आहे. केडीएमसीच्या सावळाराम म्हात्रे कोरोना केअर सेंटरमधून रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेरून विकत आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिल्याने रुग्णाचे नातेवाईकांकडून हे इंजेक्शन मिळविण्यासाठीची धावपळ सुरू झाली आहे. 

  प्रिस्क्रिप्शन पालिकेच्या फार्मासिस्टला देण्यात आलं होतं ते नातेवाईकांच्या हातात कसं गेलं याबाबत चौकशी सुरू आहे. तसेच रेमडेसिवीरचे प्रिस्क्रिप्शन रुग्णाच्या नातेवाईकांना लिहून न देता ते सेंटर मध्येच उपलब्ध करून घ्यायचे आहे अशा सूचना देखील देण्यात आल्या असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. दरम्यान पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच व्हिडिओ कॉन्फरच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील  कोरोनां स्थितीबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत रेमडेसिवीरच्या वापराबाबत भरारी पथक नेमले असल्याचे केडीएमसी प्रशासनाने सांगितलं. त्यामुळे हे पथक आता ऍक्शन मोडमध्ये केव्हा येतात? तसेच अन्न व औषध प्रशासन विभागानेही यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणhospitalहॉस्पिटलremdesivirरेमडेसिवीर