शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोना रुग्णांचा मृत्युदर केडीएमसी आणणार शून्यावर,आयुक्तांची डॉक्टरांसाेबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 23:50 IST

coronavirus News : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी मृत्युदर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मिशन बिगेनअंतर्गत सगळे व्यवहार अनलॉकमध्ये सुरू झाले आहेत.

कल्याण - केडीएमसी हद्दीतील कोरोना रुग्णांचा मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या दृष्टीने त्यांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांची बैठक घेतली.कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी मृत्युदर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मिशन बिगेनअंतर्गत सगळे व्यवहार अनलॉकमध्ये सुरू झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र नागरिकांची वर्दळ वाढल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर, १५ डिसेंबरपासून लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासाठी एक बैठक राज्य सरकारच्या पातळीवर घेतली जाणार आहे.कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्यासाठी मनपाची काय उपाययोजना आहे, याबाबत चर्चा करण्यासाठी सूर्यवंशी यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या दालनात डॉक्टरांची एक बैठक घेतली. यावेळी इंडियन मेडिकल असोसिशएनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, ‘निमा’च्या अध्यक्षा डॉ.गायत्री कुलाली, ‘धारपा’च्या अध्यक्षा डॉ.भावना ठक्कर, आयएमए डोंबिवलीचे अध्यक्ष डॉ. सुनीत उपासनी, डोंबिवलीचे सेक्रेटरी डॉ.हेमंत पाटील, निमा डोंबिवलीचे सेक्रेटरी डॉ.माधुरी बहीरट, होमिओपॅथीक डॉक्टर फेडरेशनचे अध्यक्ष जयेश राठोड, निमाचे कल्याणचे प्रेसिडंट कल्याण डॉ.अनिल पाटील, मनपाच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील, शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहासिनी बडेकर, रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पुरुषोत्तम टिके उपस्थित होते.मनपा सध्या दररोज अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या करत असून, त्यांचे प्रमाण १,७०० ते दोन हजारांदरम्यान आहे. रेल्वे स्थानकावरही चाचणी सुरू आहे, असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले. छोटे दुकानदार, भाजीवाले, किराणा दुकानदार, बांधकाम कामगार, हॉटेलमधील कामगार यांना ताप आल्यास त्वरित त्यांची कोरोना चाचणी करावी, तसेच नॉनकोविड रुग्णालयात कोविड रुग्णास उपचारासाठी दाखल केल्यास संबंधित रुग्णालयाच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे रुग्णालयांची जबाबदारी वाढली आहे. 

‘शीतगृह, लशीची माहिती संकलित करा’कोविडचे संभाव्य लसीकरण लक्षात घेऊन मनपा हद्दीतील शीतगृहे शोधून ठेवावीत, तसेच लशीची माहिती संकलित करून ठेवावी, असे आदेश वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांना आयुक्तांनी दिली आहेत. अजून कोविडचे संकट टळलेले नाही. त्यामुळे यंत्रणा सज्ज ठेवून दुसरी लाट येणार नाही, अशी अपेक्षा करू या, असे आवाहन आयुक्तांनी डॉक्टरांना केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका