क्या बात है; डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 03:51 PM2021-07-31T15:51:38+5:302021-08-02T17:21:19+5:30

कोरोनाची लस घेण्याबाबत अजूनही काही लोकांमध्ये मतमतांतरे असताना  डोंबिवलीत राहणाऱ्या 103 वर्षांच्या अजीबाईंनी कोरोनाची लस घेतली.

The corona vaccine was administered by a 103-year-old grandmother in dombivali | क्या बात है; डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोनाची लस

क्या बात है; डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोनाची लस

Next

कल्याण:  कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी लसीकरण हे अत्यंत महत्वाचे आहे असे तज्ञांनी सांगितले आहे. मात्र काही नागरिक अजूनही लस घेण्याबाबत संभ्रमामध्ये असल्याचे दिसून येते. कोरोनाशी लढा देण्यासाठी अपंग बांधवही पूढे येऊन लस घेत आहे. डोंबिवलीमधील 103 वर्षांच्या आजीबाईंनी सुद्धा कोविड लस घेतली आहे. 

कोरोनाची लस घेण्याबाबत अजूनही काही लोकांमध्ये मतमतांतरे असताना  डोंबिवलीत राहणाऱ्या 103 वर्षांच्या अजीबाईंनी कोरोनाची लस घेतली. कृष्णाबाई महाजन असे या आजींचे नाव असून त्यांनी डोंबिवली येथील केडीएमसीच्या पाटकर लसीकरण केंद्रावर ही लस घेतल्याची माहिती त्यांचे पणतू जयेश अग्निहोत्री यांनी दिली आहे .त्यामुळे अद्यापही कोरोनाची लस घेण्यासाठी साशंक असणाऱ्या लोकांसाठी या 103 वर्षांच्या अजीबाईंनी लस घेत एकप्रकारे सकारात्मक संदेश दिला आहे.

Web Title: The corona vaccine was administered by a 103-year-old grandmother in dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.