शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : कोरोनाची लस घेतल्यानंतर तरुणाला झाला त्रास, भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 17:38 IST

Corona Vaccination : भावेशचे वडील रिक्षा चालक आहेत. भावेश हा दावडी येथे राहतो. तो इंजिनिअर आहे. पुणे येथील कंपनीत तो कामाला आहे. त्याने रविवारी ममता रुग्णालयातून कोव्हिशील्ड लस घेतली.

कल्याण  : डोंबिवली दावडी परिसरात राहणाऱ्या भावेश चकोर या 24 वर्षीय तरुणाने ममता रुग्णालयात लस घेतल्यानंतर त्याला त्रास झाला. त्याला पक्षाघातासारखी लक्षणे दिसून येत आहेत. त्याला महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एमआरआय करण्यासाठी पाठविण्यात आले. त्या रिपोर्टमध्ये काय निष्पन्न होते. त्यानंतर ममता रुग्णलयाकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान या प्रकरणी भाजपा पदाधिकारी रुग्णालयास प्रशासनास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता प्रवेश द्वारावर पदाधिकाऱ्यांचा रुग्णालय कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. भावेशचे वडील रिक्षा चालक आहेत. भावेश हा दावडी येथे राहतो. तो इंजिनिअर आहे. पुणे येथील कंपनीत तो कामाला आहे. त्याने रविवारी ममता रुग्णालयातून कोव्हिशील्ड लस घेतली. त्याला रविवारी संध्याकाळी ताप आला. त्यानंतर त्याचा डोळा आणि तोंड एका बाजूने थरथरू लागल्याचे जाणवू लागले. हा त्रास जास्त झाला असता त्याने रुग्णालय प्रशासनाकडे धाव घेतली. रुग्णालय प्रशासनाने त्याला महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात एमआरआय काढण्यासाठी पाठविले आहे. त्याचा रिपोर्ट आल्यावर पुढील उपचार केले जातील असे सांगितले आहे. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले की, भावेशला रविवारी ज्या स्टॉकमधून लस दिली गेली. तीच लस अनेकांना दिली गेली. भावेशला त्रास झाल्याची पहिलीच केस आहे. या प्रकरणी महापालिकेस सूचित केले आहे. भावेशचा एमआरआय रिपोर्ट आल्यावर नक्की काय आहे ते स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. हा प्रकार कळताच भाजपाचे पदाधिकारी नंदू परब आणि मनिषा राणे यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालय प्रशासनाने त्यांना प्रवेश द्वाराजवळच अडविले. त्यामुळे पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस