शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंतेत वाढ; आयुक्तांनी घेतली खासगी डॉक्टरांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 19:34 IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.या पाश्र्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली. त्यात विशेष करुन स्त्रीरोग आणि बालरोग तज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. कारण आढळून येणा:या रुग्णांमध्ये मुले आणि गरोदर महिलांचा समावेश जास्त दिसून येत आहे. या परिस्थिती घाबरून न जाता लक्षणो जाणवताच प्रत्येकाने टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन महापालिका अयुक्तांनी केले आहे.

महापालिका हद्दीतील नागरीकांमध्ये कोरोना टेस्ट करुन घेण्याविषयी भिती आहे. कारण नागरीकांना वाटते की, टेस्ट पॉझीटीव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात भरती केले जाईल. ज्यांच्या घरी होम आयसोलेशनचे व्यवस्था आहे. त्यांना रुग्णालयात भरती होण्याची सक्ती केली जाणार नाही.

महापालिकेने कोरोना टेस्ट वाढविल्या आहेत. दिवसाला तीन हजार कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. महापालिकेची स्वत:ची आणि पीपीपी तत्वावर चालविली जाणारी कोरोना टेस्ट लॅबमध्ये दिवसाला सहा हजार जणांनी कोरोना टेस्ट केली जाऊ शकते अशी माहिती आयुक्तांनी दिली. आज खाजगी डॉक्टरांची व्हीसी आयुक्तांनी घेतली. त्याला शहरातील 75 खाजगी डॉक्टर उपस्थित होते. महापालिकेच्या लॅब आणि कलेक्शन सेंटरमधून कोरोना चाचणी केली जात आहे. खाजगी लॅबना त्यांचे कलेक्शन सेंटर वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

एखादी गरोदर महिला पॉझीटीव्ह आल्यास तिची धावपळ होणार नाही तिला त्रस होणार नाही अशा पद्धतीने तिच्यावर उपचार केल जावेत. तसेच एखाद्या मुलाला कोरोना झाल्यास त्याच्या घरी सोय असल्यास त्याला रुग्णालयात दाखल करण्याची सक्ती करता कामा नये अशा सूचना दिल्या डॉक्टरांना दिल्या आहे. काल देखील आयुक्तांनी फॅमिलि डॉक्टरांची बैठक घेऊन लक्षणो आढळून येणा:या रुग्णाला टेस्ट करण्यासाठी तातडीने सेंटरला पाठवावे असे सूचित केले आहे. महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी  हॉस्पीटलाईज होण्याचा रेट हा ेएक टक्का आहे. ज्या नागरीकांनी लसीकरण केले नाही. ज्यांचा पहिला डोस झाला आहे. त्यांनी दुसरा डोस घ्यावा. महापालिका हद्दीत 15 ते 18 वयोगटातील विद्याथ्र्याचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरु झाले. आत्तार्पयत 38 हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणcorona virusकोरोना वायरस बातम्या