शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

"रेल्वे आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया राबविणार, येत्या आठवड्यात भूसंपादन सुरू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 13:19 IST

Kalyan News: कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी थेट खरेदीची प्रक्रिया राबविला जात होती. या प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याने येत्या आठवडय़ात सक्तीने जमीन संपादनाची प्रक्रिया राबविली जाईल

कल्याण - कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी थेट खरेदीची प्रक्रिया राबविला जात होती. या प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याने येत्या आठवडय़ात सक्तीने जमीन संपादनाची प्रक्रिया राबविली जाईल अशी माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया गतमान होऊन संपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे उपविभागीय अधिका:यांनी सांगितले.

कल्याण ते कसारा रेल्वे मार्गा दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्यासाठी ९,८४ हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. या प्रकल्पात बेरे, राये, पितांबरे, वावेघर, खडवली, बल्याणी, गुरवली, चिंचवली, मोस, मोहने, आंबिवली, मांडा, अटाळी, चिकणघर या गावातील जमीन बाधित होत आहेत. यामध्ये सातबाराचे २२८ गट आहे. जमीन संपादनाकरीता उपविभागीय कार्यालयाकडून जमीनीच्या थेट खरेदीची प्रक्रिया राबविली गेली होती. त्यास अत्यल्प प्रतिसाद आला. २२८ पैकी केवळ पाचच गटांचे संपादन करण्यात आले आहे. कल्याण कसारा दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्याचा रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी भूसंपादन तातडीने होण्याकरीता थेट खरेदीची प्रक्रिया राबविली होती. मात्र त्यातून संपादन होत नसल्याने आत्ता सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्याची सुरुवात येत्या आठवडाभरात केली जाईल.

कल्याण कसारा प्रमाणोच कल्याण बदलापूर याठिकाणीही रेल्वेची तिसरी लाईन विकसीत करण्यासाठी २५ एकर जागा संपादीत करायची आहे. त्यासाठीही जमीन खरेदीची थेट प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्याठिकाणीही प्रतिसाद कमी असल्याने तिथेही सक्तीचे संपादन केले जाणार आहे.

रेल्वेच्या कल्याण कसारा व कल्याण बदलापूर लाईनसाठी सक्तीचे भूसंपादन राबविले जाणार आहे. त्याच धर्तीवर कल्याण शीळफाटा रस्त्याच्या सहा पदरीकरणाकरीता ७.१२ हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. या रस्त्याच्या सहा पदरीकरणात निळजे, काटई, नेतीवली, कचोरे, सागव, सोनारपाडा, घारीवली, मानगाव याठिकाणची जमीन बाधित होणार आहे. सध्या या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम सुरु आहे. हा रस्ता या पूर्वी चौपदरी होता. सध्या अस्तित्वात असलेल्या चौपदरी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण सुरु आहे. मात्र सहाव्या पदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेकरीताही जमीन संपादनाची प्रक्रिया येत्या आठवडय़ात सुरु केली जाईल. त्यासाठी सक्तीने भूसंपादन केले जाईल. रेल्वे आणि रस्ते प्रकल्पासाठी सक्तीचे भूसंपादन करुन संपादनाची प्रक्रिया येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य डोळ्य़ासमोर ठेवण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी भांडे पाटील यांनी सांगितले.

रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनात बाधित होणा:याकरीता जवळपास २०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तजवीज केली जाणार आहे. त्याच प्रमाणे कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरीकरणात बाधित होणा:यांकरीता १०० कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची तजवीज करण्यात आली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेkalyanकल्याण