शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:43 IST

महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याण: महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या अ प्रभागातील आंबिवली येथील नेपच्यून स्वराज येथील आरक्षित भूखंडावर वृक्षारोपण करतेवळी त्यांनी हे उद्गार काढले. या परिसरात कबड्डी खेळणारे खूप तरुण आहेत, त्यामुळे या परिसरामध्ये आपण जास्तीत जास्त कबड्डीचे मैदाने तयार करण्याचा प्रयत्न करु, असेही ते पुढे म्हणाले. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे औचित्य साधून आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील स्वच्छता दूत, एनजीओ, इमारतीच्या आवारात खत प्रकल्प राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्था, स्वच्छता कामगार यांचा प्रशस्तीपत्रक देऊन आयुक्त सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेची जबाबदारी घेऊन आपला परिसर व आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे राहील याची काळजी घ्यावी. 

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही स्वतःची जबाबदारी ओळखून त्यामध्ये कुचराई होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी व नागरिकांच्या सहकार्याने आपल्या शहराच्या किमान स्वच्छतेच्या बाबतीत तरी कायापालट करावा, असे आवाहन  सूर्यवंशी यांनी करुन उपस्थितां समवेत स्वच्छतेची शपथ घेतली .राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या प्रभागांत ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका