शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात; खराब रस्ते आणि इतर समस्यांमुळे नागरिक संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 19:33 IST

Dombivali News : दर महिन्यात दोन ते तीन वेळा या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या फुटतात आणि त्यामुळे त्यानंतर तीन-चार दिवस कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा येथील नागरिकांचा अनुभव आहे.

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एमआयडीसी निवासी विभागातील नागरिक गेली अनेक वर्षे खड्डेमय रस्ते, अनियमित/अनियंत्रित पाणी पुरवठा, प्रलंबित मलनिस्सारण रचना, विजेचा लपंडाव आणि स्वच्छता या महत्वाच्या समस्यांवर तोडगा काढावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु त्यांच्या या सर्व मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसून परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही. डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग दक्ष नागरिक मंचच्या समूहाने या भागात राहणाऱ्या अनेक नागरिकांसोबत चर्चा करून या परिस्थितीबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणांना जाब विचारण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या रविवारी येथील नागरिक मूक आंदोलन करणार असून, कोविडच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तशा सूचना नागरिकांना वेळोवेळी देण्यात येत आहेत. सर्व नागरिक रस्त्याच्या दुतर्फा दहा दहा फुटाच्या अंतरावर निषेध फलक घेऊन उभे राहतील अशी रचना करण्यात आली आहे. आंदोलनासाठी डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग दक्ष नागरिक मंचच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून हा मंच पूर्णतः अराजकीय असून, सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन दबावगट म्हणून काम करणाऱ्या नागरिकांचा समूह असल्याची माहिती  दक्ष नागरिक मंचचे  विजय मेटकर, अतुल रायकर,  वैभव जोशी आणि अतुल  मोडक यांनी दिली.         दर महिन्यात दोन ते तीन वेळा या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या फुटतात आणि त्यामुळे त्यानंतर तीन-चार दिवस कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा येथील नागरिकांचा अनुभव आहे. खड्डेमय रस्ते ही समस्या तर पूर्ण डोंबिवलीची असून इथल्या नागरिकांनी गेले अनेक वर्षे याबाबत आवाज उठवला आहे. अनेक वेळा रस्त्यांसाठी निधी मिळाल्याच्या बातम्या नागरिकांपर्यंत येतात पण महापालिका आणि MIDC यांच्याकडे पाठपुरावा केला असता याबाबतची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यात त्यांचा वेळ जातो असा अनुभव येथील नागरिकांना आला आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून  व्यक्त होत आहेत. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीPotholeखड्डे